मुंबई -जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजपा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. देशभर यात्रेच्या नावाखाली गर्दी जमवली जात आहे. दुसऱ्या लाटेच्यावेळी निवडणुकीसाठी अफाट गर्दी जमवल्याने हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. याला भाजपा कारणीभूत होती ही सत्य परिस्थिती आहे, अशी टीका अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओ व या क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी गर्दी टाळली नाही, तर तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. मात्र जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजपा गर्दी जमवत आहे. राज्यातही राजकीय कार्यक्रम होत आहेत. या राजकीय कार्यक्रमामुळे तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होत आहे. याला भाजपा जबाबदार ठरणार असे चित्र दिसत आहे. राज्यसरकारने तयार केलेल्या नियमांचे उल्लंघन होत असेल तर निश्चितरुपाने गुन्हा दाखल करुन कारवाई होणार आहे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. तसेच निवडणूका येत-जात राहतील, परंतु लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत, हे भाजपाच्या लोकांना कळले पाहिजे, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.
...तर कोरोनाच्या तिसर्या लाटेलाही भाजपा कारणीभूत ठरणार - नवाब मलिक
आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओ व या क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी गर्दी टाळली नाही, तर तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. मात्र जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजपा गर्दी जमवत आहे.
नवाब मलिक