महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Corona Update - तिसऱ्यांदा कमी रुग्णांची नोंद, 1715 नवे रुग्ण, 29 रुग्णांचा मृत्यू

आज राज्यात 1715 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 91 हजार 697 वर पोहोचला आहे. तर आज 29 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 789 वर पोहोचला आहे. आज 2 हजार 680 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Corona Update
Corona Update

By

Published : Oct 17, 2021, 9:00 PM IST

मुंबई -राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन गेले काही दिवस 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात घट होऊन 11 ऑक्टोबरला 1736, 16 ऑक्टोबरला 1553 तर आज 17 ऑक्टोबरला 1715 रुग्णांची नोंद झाली आहे. आज 29 मृत्यूंची नोंद झाली असून 2 हजार 680 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.39 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.


28,631 सक्रिय रुग्ण
आज राज्यात 1715 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 91 हजार 697 वर पोहोचला आहे. तर आज 29 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 789 वर पोहोचला आहे. आज 2 हजार 680 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 65 लाख 91 हजार 697 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.39 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 10 लाख 20 हजार 463 नमुन्यांपैकी 65 लाख 91 हजार 697 नमुने म्हणजेच 10.8 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 20 हजार 474 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 28 हजार 631 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.


रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 11 सप्टेंबरला 3 हजार 075, 29 सप्टेंबरला 3187, 30 सप्टेंबरला 3063, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 16 ऑक्टोबरला 1553, 17 ऑक्टोबरला 1715 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 4 ऑक्टोबरला 26, 5 ऑक्टोबरला 39, 6 ऑक्टोबरला 90, 10 ऑक्टोबरला 28, 11 ऑक्टोबरला 36, 12 ऑक्टोबरला 43, 13 ऑक्टोबरला 49, 14 ऑक्टोबरला 35, 15 ऑक्टोबरला 29, 16 ऑक्टोबरला 26, 17 ऑक्टोबरला 29 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.


या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 366
अहमदनगर पालिका - 202
पुणे - 237
पुणे पालिका - 106
पिंपरी चिंचवड पालिका - 52
सोलापूर- 56
सातारा - 69
हेही वाचा -Health Department Exam : परीक्षार्थींसाठी जिल्ह्यातच परीक्षा केंद्र.. आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details