महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई: मुले चोरी करण्याच्या संशयावरुन महिलेला जमावाकडून मारहाण

मागील काही दिवसांपासून शिवाजीनगर आणि गोवंडी - मानखुर्द परिसरामध्ये मुले चोरी करणारी टोळी कार्यरत असल्याची अफवा आहे. यामुळे निष्पाप नागरिकांना जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

शिवाजीनगरातील दृष्य

By

Published : Sep 26, 2019, 4:05 AM IST

मुंबई - बुधवारी दुपारी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहमानिया मस्जिदीजवळ एक महिला संशयास्पदरित्या फिरत होती. यावेळी स्थानिक नागरिकांनी ही महिला लहान मुले चोरी करणारी आहे, असे समजून तिला मारहाण केली. तसेच तिला पकडून ठेवले व पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, पालकांच्या तक्रारीवरून या महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

शिवाजीनगरातील दृष्य

बुधवारी दुपारी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मट्टी रोडवर घरासमोर एक वर्षीय मुलगी खेळत होती. यावेळी आरोपी महिलेने तीला पळवून नेले. अशी तक्रार फिर्यादी महिलेने पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यानुसार आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा -युती झाली किवा तुटली तरी शिवसेनेचे सामर्थ्य दाखवू - दिवाकर रावते

मागील काही दिवसांपासून शिवाजीनगर आणि गोवंडी-मानखुर्द परिसरामध्ये मुले चोरी करणारी टोळी कार्यरत असल्याची अफवा आहे. यामुळे निष्पाप नागरिकांना जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, एका अमराठी महिलेला मानखुर्द मंडळ परिसरामध्ये मुले चोरीच्या गैरसमजातून जमावाकडून मारहाण करण्यात आली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत त्या महिलेला आपल्या ताब्यात घेतले. मात्र, संतप्त जमावानी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली होती. यावेळी पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा मागवून सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. या घटनेत अनेक लोकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा -ईडीने शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही - मुख्यमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details