मुंबई -मुंबईतील सर्वात उच्चभूत परिसर म्हणून ओळख असलेल्या मरीन ड्राईव्ह ( Marine Drive ) परिसरातील वानखडे स्टेडियमच्या ( Wankhade Stadium ) बाजूला असलेले जयंत महल या सोसायटीमध्ये शुक्रवारी सकाळच्या सुमारास चोरट्याने चौथ्या मजल्यावरून ( Thief jumped Fourth Floor ) उडी मारली. पोलिसांपासून वाचवण्याकरिता चोरट्याने हे पाऊल उचलले आहे. उडी मारल्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखले केले. मात्र उपचारादरम्यान चोरट्याचा मृत्यू ( thief died during treatment ) झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रोहित ( 26 ) असे मृत झालेल्या चोरट्याचे नाव आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी मृत्यूचा गुन्हा नोंदवलाआहे.
Thief Jumped Video : चोरी करायला गेलेल्या चोराची चौथ्या मजल्यावरुन उडी; उपचारादरम्यान मृत्यू
वानखडे स्टेडियमच्या ( Wankhade Stadium ) बाजूला असलेले जयंत महल या सोसायटीमध्ये ( Jayant Mahal Society ) शुक्रवारी सकाळच्या सुमारास चोरट्याने चौथ्या मजल्यावरून उडी ( Thief jumped Fourth Floor ) मारल्याची घटना घडली आहे. पोलिसांपासून वाचवण्याकरिता चोरट्याने हे पाऊल उचलले. उडी मारल्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखले केले. मात्र उपचारादरम्यान चोरट्याचा मृत्यू ( thief died during treatment ) झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चोरावर गुन्हा दाखल -पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय दंड संहितेच्या कलम 511, 304 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मरिन ड्राईव्ह परिसरातील जयंत महल सोसायटीतील नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चोर शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास इमारतीत घुसला होता. इमारतीच्या एका गेटवर वॉचमन तैनात होता. त्यामुळे चोराने दुसऱ्या गेटवरुन उडी मारुन इमारतीत प्रवेश केला. चोर घुसल्याचा संशय असल्याने सुरक्षारक्षकाने तातडीने अलार्म वाजवून इमारतीमधील रहिवाशांना सतर्क केलं. त्यानंतर एका रहिवाशाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी तत्काळ इमारतीजवळ दाखल झाले. पोलिसांना पाहताच हा चोर खिडकीचा वापर करुन इमारतीवर चढला. पोलिसांनी त्याला अटक होणार नाही असे, आश्वासन देऊन खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना त्यात अपयश आले. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाला बोलावण्याचा निर्णय घेतला.
उपचारादरम्यान चोराचा मृत्यू -अग्निशमन दल,पोलीस कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकची सुरक्षा जाळी पकडून चोराला त्यात उडी मारण्यास सांगितले. काही रहिवाशांनी त्याला चौथ्या मजल्यावरील एका घरात जाण्यास सांगण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. सुमारे तीन तासांच्या समजूतीनंतर सकाळी 7.15 च्या सुमारास सेफ्टी बेल्ट वापरुन एक पोलीस कर्मचारी चौथ्या मजल्यावरील खिडकीतून खाली उतरला. पोलीस कर्मचारी त्याच्याजवळ जाताच त्या व्यक्तीने चौथ्या मजल्यावरुन शेजारील विश्व महल इमारतीच्या कंपाऊंडमध्ये उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी जेजे रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचाव -Murder of a friend : आई वरुन शिवी देणाऱ्या मित्राला दोन सख्या भावाने संपवले