मुंबई -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्यात दहीहंडी उत्सव साजरा होणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत राज्यातील गोविंदा पथकांसोबत झालेल्या बैठकीत सर्वसहमतीने यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी गोविंदा पथकांच्या प्रमुखांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन केले. यावेळी सर्वांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत दहीहंडी साजरी न करण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन, गोविंदा पथकांचा प्रतिसाद
कोरोनाच्या दुसऱ्या लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जातो आहे. या पार्श्वभूमीवर यंदाही मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव साजरा करण्यास राज्य सरकारकडून रेड सिग्नल दर्शवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (सोमवार) महाराष्ट्रातल्या सर्व गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसमवेत ऑनलाईन बैठक झाली. दरम्यान, जनतेच्या आरोग्यासाठी काही काळ सणवार, उत्सव बाजूला ठेवू या, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. तर सामाजिक तसेच आरोग्य विषयक उपक्रम हाती घेऊन हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करू या, अशी भावना व्यक्त पथकांच्या प्रतिनिधींनी केली. मात्र, गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही गोविदांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
'संयम आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार करूया'
मुंबईसह राज्यात दरवर्षी दहिहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जाताे. गेल्या वर्षापासून कोरोनाचे संकट असल्याने मुंबई, ठाण्यासह राज्यभरात दहीहंडी पथकांनी उत्सव साजरा केला नाही. मानाची हंडी जागेवर फोडण्यासह यंदा छोट्याप्रमाणात का होईना उत्सावाला परवानगी द्यावी, अशी मागणी दहीहंडी पथकांच्या समन्वय समितीने राज्य सरकारकडे केली होती. सर्व गोविदांना लसीचे दोन डोस पूर्ण करत दहीहंडी उत्सव सुरक्षितपणे साजरी करण्याची जबाबदारी आमची असेल अशी ग्वाही देखील समन्वय समितीने दिली होती. मात्र, आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊ या, संयम आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार करूया, असे आवाहन केले. तसेच शासनाचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचवण्याला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
'तर नाईलाजाने लॉकडाऊन'