मुंबई - राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्य सरकार कडून राज्यातील जनतेला काही प्रमाणात का होईना मात्र दिलासा मिळेल अशी आशा होती. मात्र, अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी इंधन दरात कोणतेही कपात केली नसल्याने ही आशा फोल ठरली आहे.
राज्य सरकार कडून इंधन दर वाढीवर दिलासा नाहीच! - इंधन दर वाढीवर राज्य सरकारकडून दिलासा नाही
राज्य सरकार कडून इंधन दरवाढीवर दिलासा मिळालेला नाही. मात्र, अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी इंधन दरात कोणतेही कपात केली नसल्याने ही आशा फोल ठरली आहे.
सध्या इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत. पेट्रोलचे दर 100 पर्यंत पोहोचले आहेत, तर तिथेच डिझेलचे दर ही 85 रुपयाच्या आसपास गेले आहेत. केंद्र सरकारकडून इंधन दर वाढीवर दिलासा मिळण्याची कुठलीच चिन्हे नाहीत. त्यामुळे राज्य सरकारकडून इंधनावरील कर कमी करण्यात येईल अशी आशा सामान्य जनतेची होती. मात्र, अर्थमंत्री अजित पवार यांनी इंधन करात कोणतीच कपात केली नाही. सध्या राज्याची परिस्थिती बिकट आहे. राज्याच्या राज्याकडे पैसे नसताना जनतेला खोटी आश्वासने देणे योग्य नाही असे म्हणत इंधनावरील दर कमी न केल्याचे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. जवळपास 70 हजार कोटींची राजकोशीय तूट सध्या असून केंद्र सरकारकडून तीस हजार कोटीचा जीएसटी परतावा आला नाही, तर हीच रक्कम एक लाख कोटीपर्यंत जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळेच सध्या राज्य सरकार इंधनावरील कर माफ करण्याच्या परिस्थितीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.