मुंबई- राज्यात सध्या विकासाची चर्चा होत नाही, अशी खंत मंत्री जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Awhad ) यांनी व्यक्त केली. तसेच निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली. विधानभवनात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
Minister Jitendra Awhad : महाराष्ट्रात विकासाची चर्चा होत नाही - मंत्री जितेंद्र आव्हाड - विकासाची चर्चा
पाच राज्यातील निवडणुका पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूक येऊ घातल्या आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर ईव्हीएमचा मुद्दा चर्चेला आला आहे. अशावेळी ईव्हीएम की बॅलेट पेपर, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही महाराष्ट्रात आगामी निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केली आहे. कर्नाटकात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात आल्या होत्या. याच धर्तीवर महाराष्ट्रात निवडणुका घ्याव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचे आव्हाड म्हणाले.
पाच राज्यातील निवडणुका पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूक येऊ घातल्या आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर ईव्हीएमचा मुद्दा चर्चेला आला आहे. अशावेळी ईव्हीएम की बॅलेट पेपर, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही महाराष्ट्रात आगामी निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केली आहे. कर्नाटकात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात आल्या होत्या. याच धर्तीवर महाराष्ट्रात निवडणुका घ्याव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचे आव्हाड म्हणाले. पक्ष नेतृत्वासोबत याबाबत चर्चा झाली नाही. मात्र, हे माझे वैयक्तिक मत आहे, असेही आव्हाड म्हणाले. राज्यातील राजकारणाचा दर्जा घसरला असून कोणीही विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही, असेही आव्हाड म्हणाले.
हेही वाचा -राज्यात साखर कारखान्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ