महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हॉटेल ललित में छुपे है कई राज... नवाब मलिकांचे ट्विट

नवाब मलिक यांनी ट्विट करुन हॉटेल ललितमध्ये अनेक 'राज' लपलेले असल्याचे म्हटले आहे. त्यासोबत हॉटेल ललितमध्ये काय लपलेले आहे, त्या बद्दल रविवारी माहिती देणार असल्याचे मलिकांनी म्हटले आहे.

Nawab Malik's tweet
नवाब मलिक यांचे नवे ट्विट

By

Published : Nov 3, 2021, 1:06 PM IST

Updated : Nov 3, 2021, 1:14 PM IST

मुंबई - नवाब मलिक यांनी ट्विट करुन हॉटेल ललितमध्ये अनेक 'राज' लपलेले असल्याचे म्हटले आहे. त्यासोबत हॉटेल ललितमध्ये काय लपलेले आहे, त्या बद्दल रविवारी माहिती देणार असल्याचे मलिकांनी म्हटले आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोर्चा उघडला आहे. वानखेडे यांच्यासंबंधी मलिक रोज नवे खुलासे करत आहेत. याची माहिती ते त्यांच्या ट्विटर हँडलवर देत असतात. याच मालिकेत आता मलिकांनी नवे ट्विट केले असून हॉटेल ललितमध्ये अनेक गुपिते दडलली असल्याचे ट्विट केले आहे. याची माहिती रविवारी देणार असल्याचे त्यांनी त्यात लिहिले आहे.

हॉटेल ललित में छुपे है कई राज... नवाब मलिकांचे ट्विट

नवाब मलिकांचे नवे ट्विट

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे नेहमीच ट्विट करून, तसेच पत्रकार परिषद घेऊन एनसीबी (अमली पदार्थ विरोधी पथक) चे झोनल डायरेक्टर यांच्यावर नवनवे आरोप करत आहेत. आजही ट्विट करत त्यांनी याबाबत सूचक इशारा दिला आहे. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत, दिवाळी झाल्यानंतर रविवारी मुंबईमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये खूप रहस्य असल्याच्या आशयाचे ट्विट नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आले आहे.

'शुभ दीपावली
"आप सभी की दिवाली मंगलमय हो" "होटल 'The Lalit' मे छुपे है कई राज़..."
"मिलते है रविवार को"

म्हणत काही नवीन खुलासा करण्याचा इशारा दिला आहे.

समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांचे आरोप

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या कार्यशैलीवर नवाब मलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. बॉलीवूड मधील सेलिब्रिटींना खोट्या केसमध्ये गोवण्याचे काम समीर वानखडे करतात. तसेच कार्डिलिया क्रूझ वर त्यांनी टाकलेली धाड खोटी असून हे सर्व प्रकरण बनावट असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

Last Updated : Nov 3, 2021, 1:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details