मुंबई:जर कोरोनाची प्रकरणे वाढत राहिली तर आपल्याला मास्क घालणे अनिवार्य करावे लागेल. लसीकरणाला गती देणे हे आमचे उद्दिष्ट आहे आणि बालकांचे लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलू अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
Rajesh Tope On Mask : तर आपल्याला मास्क घालणे अनिवार्य करावे लागेल- आरोग्य मंत्री
कोरोना रुग्ण वाढत राहिले तर आपल्याला मास्क घालने आनिवार्य ( the wearing of masks compulsory) करावे लागेल असा इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिला आहे.
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारी दरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे.
१९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २४ मार्चला ५४, ३१ मार्चला ४२, १ एप्रिलला ३२, २ एप्रिलला ४९, ३ एप्रिलला ३५, ४ एप्रिलला १८, ५ एप्रिलला ५६, ६ एप्रिलला ५१, ७ एप्रिलला ४१, ८ एप्रिलला ४९, ९ एप्रिलला ५५, १० एप्रिलला ३५, ११ एप्रिलला २६, १२ एप्रिलला ५२,१३ एप्रिलला ७३, १४ एप्रिलला ५६, १५ एप्रिलला ४४, १६ एप्रिलला ४३, १७ एप्रिलला ५५, १८ एप्रिलला ३४, १९ एप्रिलला ८५, २० एप्रिलला ९८, २१ एप्रिलला ९१, २२ एप्रिलला ६८, २३ एप्रिलला ७२, २४ एप्रिलला ७३, २५ एप्रिलला ४५, २६ एप्रिलला १०२, २७ एप्रिलला ११२, २८ एप्रिलला ९०, २९ एप्रिलला ९३, ३० एप्रिलला ९४ रुग्णांची नोंद झाली आहे.