मुंबई -राज्यात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, मागणी वाढल्यामुळे या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार देखील सुरू आहे. दरम्यान रेमडेसिवीर इजेक्शन मिळवण्याच्या उद्देशाने मुंबईतल्या बांद्रा ते बोरीवली दरम्यान असलेल्या अनेक मेडिकलमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. करीन साब उल्ला खान (वय 24 वर्ष) असे या आरोपीचे नाव आहे.
रेमडेसिवीरसाठी मेडिकल दुकानांमध्ये चोरी करणारा चोरटा गजाआड कोणत्याच मेडिकलमध्ये रेमडेसिवीर मिळाले नाही
या आरोपीने आतापर्यंत जवळपास 12 हून अधिक दुकांमध्ये चोरी केली आहे, यामध्ये अनेक मेडिकल दुकानांचा समावेश आहे. आरोपीच्या म्हणण्यानुसार त्याने न्यूजमध्ये पाहिले होते की, सध्या रेमडेसिवीरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तेव्हा जर आपल्याला रेमडेसिवीर मिळाले तर ते आपल्याला ब्लॅक मार्केटमध्ये विकता येतील. या उद्देशाने आपन अनेक मेडिकल दुकानामध्ये चोरी केली. मात्र कोणत्याच मेडिकलमध्ये रेमडेसिवीर मिळाले नसल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली. विशेष म्हणजे हा आरोपी नुकताच जेलमधून सुटून आला होता.
हेही वाचा -Special : वर्षभरात कोरोनाबाधित गर्भवती महिलांचे ९९ टक्के शिशु कोरोनामुक्त