मुंबई - आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या बांधकामांविरोधात अरेवासीयांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. (2019)साली आदित्य ठाकरे यांनी मेट्रो कारशेड इतर ठिकाणी नेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. (Save Aarey Campaign) मात्र, अद्यापही मेट्रो कारशेडचे काम सुरू असल्याने हे आंदोलन केले आहे.
आदित्य ठाकरे होश में आवो च्या घोषणा
'सेव्ह आरे' या मोहिमे अंतर्गत आंदोलन सुरु असून महाविद्यालयीन तरुणांकडून येथे आंदोलन सुरू आहे. यावेळेस आदित्य ठाकरे होश में आवोच्या घोषणा देखील दिल्या जात आहेत.
या संदर्भात बोलताना आंदोलन कार्यकर्ते म्हणतात की, "आताच्या पर्यावरण मंत्र्यांनी (2019)साली शब्द दिला होता. मात्र, तो त्यांनी स्वतः कॅबिनेट मंत्री झाल्यावर पाळला नाही. मेट्रोच्या कारशेड संदर्भात सरकारकडे कोणताही ठोस प्लॅन नाहीये. त्यांना नक्की किती जागा लागणार आहे ते देखील माहिती नाही. ठोस जागेची माहिती नसताना प्रशासन कशाच्या आधारावर आरेतील झाडे तोडत आहे हा न कळणारा मुद्दा आहे."