महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात, पहिल्या दिवशी 27115 जणांचे लसीकरण - Corona Vaccination Latest News

कोरोना विषाणूची लागण होऊ नये, विषाणूपासून संरक्षण व्हावे म्हणून 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सोमवारपासून राज्यात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी राज्यात 27 हजार 115 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत 12 लाख 28 हजार 211 लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे.

कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात
कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात

By

Published : Mar 2, 2021, 3:44 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूची लागण होऊ नये, विषाणूपासून संरक्षण व्हावे म्हणून 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सोमवारपासून राज्यात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी राज्यात 27 हजार 115 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत 12 लाख 28 हजार 211 लाभार्थ्यांना कोव्हिशिल्ड व को-वॅक्सिन ही लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.

लसीकरणाची आकडेवारी

सोमवारी 27 हजार 115 लाभार्थ्यांना लस देण्यात आली . त्यांपैकी 16 हजार 8 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस, तर 11 हजार 107 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. यामध्ये 4 हजार 715 आरोग्य कर्मचाऱ्यांचा तर 6 हजार 570 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी 45-60 वयोगटातील गंभीर आजाराने ग्रस्त असणाऱ्या 946 लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला. तसंच 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या 3 हजार 777 लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे.

जिल्हानिहाय आकडेवारी -

अहमदनगर 41हजार 954
अकोला 14 हजार 489
अमरावती 25 हजार 797
औरंगाबाद 31 हजार 465
बीड 23 हजार 731
भंडारा 14 हजार 669
बुलडाणा 19 हजार 588
चंद्रपूर 24 हजार 946
धुळे 15 हजार 643
गडचिरोली 15 हजार 670
गोंदिया 15 हजार 902
हिंगोली 8 हजार 515
जळगांव 27 हजार 256
जालना 17 हजार 264
कोल्हापूर 39 हजार 694
लातूर 22 हजार 00
मुंबई 2लाख 18हजार 170
नागपूर 58 हजार 092
नांदेड 17 हजार 598
नंदुरबार 17 हजार 798
नाशिक 55 हजार 487
उस्मानाबाद 13 हजार 490
पालघर 31 हजार 060
परभणी 10 हजार 112
पुणे 1लाख 25 हजार 788
रायगड 19 हजार 243
रत्नागिरी 18 हजार 695
सांगली 28 हजार 921
सातारा 46 हजार 520
सिंधुदुर्ग 10 हजार 975
सोलापूर 37 हजार 776
ठाणे 1लाख8 हजार 308
वर्धा 22 हजार 136
वाशिम 8 हजार 983
यवतमाळ 20 हजार 485
एकूण 12लाख 28 हजार 211

ABOUT THE AUTHOR

...view details