महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३: स्विस मशीन करणार मेट्रो ट्रॅकवरील कंपन नियंत्रित - मेट्रो ट्रॅक

ट्रॅक सुरक्षित करण्यासाठी कंपन नियंत्रित करण्यासाठी स्विस मशीनचा पर्याय एमएमआरसीने पुढे आणला आहे. अशा प्रकारचे हे देशातील पहिले मशीन असणार आहे. हे मशीन मेट्रो ट्रॅकची कंपन शोषण क्षमता 22 व्हीडीबी इतकी असणार आहे. तर स्लीपर बॉक्समुळे ट्रॅक्सची कंपन शोषण क्षमता अधिक कमी होणार आहे.

Swiss machine
स्विस मशीन

By

Published : Nov 12, 2020, 6:55 AM IST

मुंबई - कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामाला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने वेग दिला आहे. त्यानुसार रोज एक-एक टप्पा पार केला जात आहे. तेव्हा आता मेट्रो ट्रॅकवरील कंपन नियंत्रित करत प्रवास सुरक्षित करण्यासाठी स्विस मशीनचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी स्विस कंपनी मे. सोनविले-निर्मित मशीनच्या सहाय्याने हाय व्हायब्रेशन अटेन्युएशन बुटेड ट्वीन स्लीपर ब्लॉक्सची निर्मिती प्रायोगिक तत्वावर सुरू केली आहे. ही ट्रॅक यंत्रणा अद्ययावत असून स्लीपर बॉक्सची निर्मिती वडाळा येथे करण्यात येत असल्याचे एमएमआरसीकडून सांगण्यात आले आहे.

अशाप्रकारचे पहिले मशीन -
33.5 किमीच्या मेट्रो 3 च्या भुयारीकरणाचे 80 टक्के काम झाल्याचे एमएमआरसीकडून सांगितले जात आहे. तर आता भुयारीकरण झाल्यानंतर ट्रॅक बसवण्याचे काम सुरू आहे. तर आता ट्रॅक सुरक्षित करण्यासाठी कंपन नियंत्रित करण्यासाठी स्विस मशीनचा पर्याय एमएमआरसीने पुढे आणला आहे. अशा प्रकारचे हे देशातील पहिले मशीन असणार आहे. हे मशीन मेट्रो ट्रॅकची कंपन शोषण क्षमता 22 व्हीडीबी इतकी असणार आहे. तर
स्लीपर बॉक्समुळे ट्रॅक्सची कंपन शोषण क्षमता अधिक कमी होणार आहे.

2 लाख 1 हजार 600 स्लीपर बॉक्स लागणार -
मेट्रो टॅंकचे कंपन नियंत्रित करणाऱ्या या स्विस मशीनसाठीअंतर्गत संपूर्ण ट्रॅकसाठी एकूण 2 लाख 1600 स्लीपर बॉक्स लागणार आहेत. या बॉक्सची निर्मिती सुरू असून 2 मशीनद्वारे एका महिन्याला 12 हजार स्लीपर बॉक्स तयार करण्यात येणार आहेत. तर हे सर्व काम स्विस कंपनीच्या देखरेखीखाली केले जात आहे. दरम्यान मुंबईत मेट्रो 3 मार्गालगत अनेक जुन्या इमारती असून शाळा, रुग्णालये, महाविद्यालये आहेत. अशावेळी ट्रॅकचे कंपन कमी होणे ही बाब महत्वाची ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details