मुंबई - शिवसेनेची निवडणूक आयोगाविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली ( petition accepted by Supreme Court ) आहे. शिवसनेच्या धनुष्यबाण चिन्हावर (shivsena bow and arrow symbol ) सुप्रिम कोर्टाकडून 1 ऑगस्टला सुनावणी ( Hearing on 1st August )होणार आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून पक्षाचे चिन्ह हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्याकडून शिवसनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्यात येत आहे.
मूळ शिवसेना आपणच -शिवसेनेवर आपला ताबा राहवा यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून आता महत्त्वाच्या हालचाली करायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेची ओळख असलेली त्यांची निशाणी धनुष्यबाण (bow and arrow symbol) याच्यावरच आता एकनाथ शिंदे गटाकडून दावा करण्यात आला आहे. मूळ शिवसेना आपणच असून शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण हे आपल्यालाच मिळावं यासाठी एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती . तर आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती (Shiv Sena before Election Commission).
रस्सीखेच सुरू -सत्ता संघर्षपासून सुरू झालेली ही लढाई, आता पक्ष कोणाचा इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. धनुष्यबाण ही निशाणी आपल्याला मिळावी यासाठी आता एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. 8 ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार होती . दोन्ही बाजूने योग्य ती कागदपत्रे घेऊन आठ ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगापुढे दोन्ही पक्षाने उपस्थित राहण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होते. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.