मुंबई : मागच्या कित्येक दिवसांपासून मान्सूनच्या प्रतिक्षेत (Monsoon Update) असलेल्या बळिराजाला दिलासा मिळाला आहे. (FARMER) कोकणातून आलेला मान्सून (monsoon) राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात आगेकूच केला. पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच कोकणात पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. (Chance of heavy rains in Konkan in next 24 hours)
मुंबई शहरातील वातावरण : मुंबईत मात्र हवामान चांगलं आहे. (Mumbai Weather) मान्सूनची चाहुल लागली आहे. अनेक भागात जोरदार पाऊस (Heavy Rain in Mumbai) झाला. जोरदार वारे वाहत आहेत. यातच आता हवामान खात्याने (IMD) पुढील पाच दिवसांसाठी एक इशारा दिला आहे.
राज्यात सर्वदूर मान्सून : राज्यात बऱ्यापैकी मान्सूनचा पाऊस पडत आहे. राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. पेरणी झालेल्या पिकांनाही पावसामुळे दिलासा मिळाला आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची आवश्यकता आहे. तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली.
मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण : आगामी काळात पावसाला पोषक वातावरण असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत विदर्भ, मध्य महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रपद्रेशसहित बंगालच्या उपसागरापर्यंत काही भाग पावसाने व्यापला जाईल.
हेही वाचा :Mumbai Building Collapsed : मुंबईत मोठी दुर्घटना.. इमारत कोसळली.. २० ते २५ जण ढिगाऱ्याखाली अडकले, एकाचा मृत्यू