महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या - पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने उन्हाळी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून यासंदर्भातील परिपत्रक सुद्धा प्रसिद्ध करण्यात आले आहे.

postgraduate-medical-courses exam
postgraduate-medical-courses exam

By

Published : May 10, 2021, 12:00 AM IST

मुंबई - वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने उन्हाळी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून यासंदर्भातील परिपत्रक सुद्धा प्रसिद्ध करण्यात आले आहे.

कोरोना रुग्णांच्या सेवेत निवासी डॉक्टर व्यस्त-

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे राज्यातील वैद्यकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. तसेच राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर हे कोरोना रुग्णांच्या सेवेत व्यस्त आहेत. ही बाब लक्षात घेता राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 24 जुलैला होणाऱ्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे राज्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम करणारे म्हणजेच निवासी डॉक्टर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

'या' कारणासाठी पुढे ढकलली परीक्षा -

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्राची परीक्षा 24 जुलैपासून घेण्यात येणार होती. संपूर्ण राज्यामध्ये 40 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अडीच हजार निवासी डॉक्टर आहेत. हे सर्व डॉक्टर कोरोना रुग्णांच्या सेवेत आहेत. त्यामुळे ऐन कोरोना काळात परीक्षा घेतल्यास त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन 24 जुलैपासून होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नये-

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून परीक्षा पुढे ढकलण्यातचे परिपत्रक सुद्धा काढलेले आहे. तसेच परीक्षा संदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नयेत तसेच परीक्षा संदर्भातील माहितीसाठी विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आव्हान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी केलेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details