महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Monsoon Session 2022 विधानसभेचे अधिवेशन सुरू होत असून प्रश्नोत्तराचा तास राहणार अनुत्तरीत

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अखेरीस १७ ऑगस्टपासून सुरु होत आहे कोणत्याही अधिवेशनामध्ये जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी अतिशय महत्त्वाची आयुधे मानले जातात Monsoon Session 2022 मात्र आमदारांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचना आणि तारांकित प्रश्नांच्या फायलींचे गठ्ठे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पडून आहेत

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Aug 16, 2022, 4:25 PM IST

मुंबईपावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा आणि विधानपरिषदेतील सदस्यांनी आपल्या लक्षवेधी सूचना आणि तारांकित प्रश्न संबंधित विभागांना पाठवले होते पण मंत्रीमंडळाचा विस्तार रखडल्यामुळे संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी या फाईल आप आपल्या विभागातच ठेवल्या होत्या गेल्या ९ ऑगस्ट रोजी मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना हायसे वाटले होते Monsoon Session of Shinde Govt परंतु खातेवाटप न झाल्यामुळे सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी या फाइल्स मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविल्या आहेत त्यामध्ये सुमारे ७०० ते ७५० तारांकित प्रश्न असल्याचे समजते

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे

अधिवेशनापूर्वी पंधरा दिवस काम अपेक्षितअधिवेशन सुरु होण्याच्या १५ ते २० दिवस अगोदर आमदारांमार्फत संबंधित विभागांकडे लक्षवेधी सूचना आणि तारांकित प्रश्न येत असतात संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी लेखी उत्तरे दिल्यानंतर ती विधानमंडळ कार्यालयाकडे पाठवली जातात तेथे शुद्धलेखन आणि राजशिष्टाचार तपासणी करून शासकीय मुद्रणालयाकडे छपाईसाठी पाठवली जातात त्यानंतर उत्तरांच्या छापील पुस्तकांचे सर्व आमदारांना वितरण केले जाते परंतु अद्याप एकाही प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून आले नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सततचे दौरे बैठका आणि लोकांच्या कामांना त्यांनी थेट प्राधान्य दिल्यामुळे लक्षवेधी सूचना आणि तारांकित प्रश्नांवर उत्तरे देण्यास त्यांना वेळ मिळाला नसल्याचे बोलले जात आहे

प्रश्नांच्या उत्तरासाठी सुट्ट्यांचा अडसरअधिवेशन बुधवारी १७ ऑगस्टपासून सुरु होणार आहे पण १३ ते १६ ऑगस्टपर्यंत विविध सार्वजनिक सुट्ट्यांमुळे मंत्रालय बंद राहिले आहे
रविवारी खातेवाटप झाल्यामुळे लक्षवेधी सूचना आणि तारांकित प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी संबंधित खात्याच्या मंत्र्यांवर येऊन पडली असली तरी मंत्र्यांना समजून सांगण्याऐवढा वेळ संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडे नाही मुख्यमंत्री हेच सर्वस्वी सर्वच खात्यांना जबाबदार असल्यामुळे आमदारांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देण्याची वेळ शिंदे यांच्यावर येऊ शकते असा अंदाजही एका वरिष्ठ
अधिकाऱ्याने वर्तवला आहे

सरकारला जनतेसाठी वेळ नाहीदरम्यान या सर्व सकारामुळे छापील उत्तरांची पुस्तके नसल्यामुळे लक्षवेधी सूचना आणि तारांकित प्रश्नांविना पावसाळी अधिवेशन पार पडण्याची शक्यता असून सरकारला जनतेच्या प्रश्नांमध्ये रस नाही सरकारला केवळ काही बिले पास करून घेणे आणि पुरवणी मागण्या मंजूर करून घेणे यातच रस असल्याचे दिसते त्यामुळे जनतेच्या प्रश्नांबाबत हे सरकार पूर्णतः उदासीन आहे असा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे

हेही वाचा -Mungantiwar tweetv सुधीर मुनगंटीवार यांच्या वंदे मातरम् म्हणण्याच्या ट्वीटवर हिंदू महासभेचे समर्थन

ABOUT THE AUTHOR

...view details