मुंबई - मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील बांगुर नगर विभागातील एका तृतीयपंथीयाची दिवसाढवळ्या हत्या झाली होती. या हत्याकांडाती आरोपींचा पोलीसांनी शोध लावाला आहे. 24 फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजता ही हत्या झाली होती. या हत्याकांडात आरोपींनी हातोडी तसेच अन्य धारदार हत्यारांचा वापर केला होता. अशी माहिती मुंबई पोलीस झोन अकराचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिली.
पोलिसांनी अशी माहिती दिली की, हे सर्व आरोपी हे मयत व्यक्तीला ओळखणारे व आजूबाजूच्या विभागात राहणारे होते. यासोबतच आरोपी व मयत व्यक्ती यांच्यामध्ये छोट्या-छोट्या कारणांवरून सतत वाद होत होते. याआधी सुद्धा मयत व्यक्तीवर दोन-तीन वेळा मारण्याचे अपयशी प्रयत्न करण्यात आले होते. मयत व्यक्ती सूर्या हा तृतीयापंथाचा गुरु होता, अशी माहिती मिळाली आहे.