मुंबई- संपूर्ण देशभरात कोरोना नियंत्रणाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी ज्या "मुंबई मॉडेलचा" आज जो गौरव होत आहे, त्या गौरवामध्ये परिचारिकांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. जागतिक परिचारिका दिनी त्या बोलत होत्या. परिचारिकांच्या सेवा कार्याचा महापाैरांनी गाैरव केला आहे.
परिचारिका दिन साजरा
१२ मे हा फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस, हा जागतिक परिचारिका दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या परिचारिका वसतिगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी महापौर बोलत होत्या. याप्रसंगी आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल, नगरसेवक मंगेश सातमकर, लोकमान्य टिळक रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, तसेच परिचारिका उपस्थित होत्या.