महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'डॉ. रघुनाथ माशेलकर टास्क फोर्सचा अहवाल दोन महिन्यात प्राप्त होणार' - Uday samant

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात कसे राबविता येईल, याचा अभ्यास करून शिफारसी करण्यासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेला टास्क फोर्स येत्या दोन महिन्यात आपला अहवाल सादर करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

उदय सामंत
उदय सामंत

By

Published : May 4, 2021, 7:05 PM IST

मुंबई - नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात कसे राबविता येईल, याचा अभ्यास करून शिफारसी करण्यासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेला टास्क फोर्स येत्या दोन महिन्यात आपला अहवाल सादर करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

स्वरातीम विद्यापीठाने मलेशियातील शिक्षण संस्थेशी सहकार्य केल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करताना विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण दिले गेले पाहिजे, असे सामंत यांनी सांगितले. स्वरातीम देशातील सर्वोत्तम शैक्षणिक केंद्र व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कुलगुरू उद्धव भोसले यांनी यावेळी विद्यापीठ अहवाल वाचन केले. तर टाटा मूलभूत विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. एस. रामकृष्णन यांनी दीक्षांत भाषण केले. दीक्षांत समारोहात २२ हजार २८५ स्नातकांनापदव्या तर २१५ उमेदवारांना पीएच.डी प्रदान करण्यात आल्याचे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details