मुंबई - शिवसेना नेत्यांवर केंद्रीय तपास संस्थांच्या धाडी पडत आहेत. या धाडी म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांचे महाराष्ट्रावर आक्रमणच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. (Aditya Thackeray On CBI) मात्र, महाराष्ट्र झुकणार नाही, महाराष्ट्र थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
आताही दिल्लीचे हे आक्रमणच आहे
शिर्डी देवस्थान विश्वस्त आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या मुंबईतील घरावर आज सकाळी आयटीने छापेमारी सुरू आहे. (Central Investigation Agency In Mumbai )बेकायदेशीर मालमत्ता जमा केल्याचा आयटीचा संशय असल्याने कनाल यांची तपासणी सुरू आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी विचारले असता, महाराष्ट्रात या आधी देखील अशी आक्रमणे झाली आहेत. आताही दिल्लीचे हे आक्रमणच आहे, असे म्हणावे लागेल. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात निवडणूक लागेल, अशी शक्यता निर्माण झाली. भाजपला महाविकास आघाडीची भीती वाटायला लागली, तेंव्हापासून सगळं सुरू आहे असही ते म्हणाले आहेत.