रेल्वे विभागाने लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करावी - नवाब मलिक - नवाब मलिक बातमी
राज्य सरकारने महिलांना प्रवास करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर रेल्वेने त्याची परवानगी दिली नाही. ज्यामुळे महिला प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

मुंबई -मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करावी आणि महिलांसाठी विशेष सेवा सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
राज्य सरकारने महिलांना प्रवास करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर रेल्वेने त्याची परवानगी दिली नाही. ज्यामुळे महिला प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे रेल्वेमंत्री पियुष गोयल हे रेल्वे सेवा सुरू करण्यास तयार आहे. मात्र, राज्य सरकारने परवानगी दिली नाही, असे सांगत आहेत; परंतु राज्य सरकारने आता परवानगी देवूनही सेवा का दिली जात नाही, असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. तसेच केंद्र सरकार यामध्ये राजकारण करत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.