मुंबई -आर्यन खान ड्रग्ज प्रकरण, समीर खान आणि इतर चार प्रकरणांचा नव्याने तपास सुरू असून मादक पदार्थ नियंत्रण विभाग अर्थात् एनसीबीने आज शनिवारी विशेष न्यायालयात अर्ज सादर करून समीर खान आणि अन्य दोन जणांच्या आवाजाचे नमुने घेण्याची परवानगी मागितली आहे.
नवाब मलिकांच्या जावयाच्या अडचणी वाढणार? आवाजाचे नमुने घेण्याच्या परवानगीसाठी NCBचा कोर्टात अर्ज - करन सजना
नवाब मलिक यांच्या जावयाच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एनसीबीने आज शनिवारी विशेष न्यायालयात अर्ज सादर करून समीर खान आणि अन्य दोन जणांच्या आवाजाचे नमुने घेण्याची परवानगी मागितली आहे.
यामुळे नवाब मलिक यांच्या जावयाच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समीर खान प्रकरणात एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे व येथील अन्य अधिकार्यांऐवजी दिल्लीतील अधिकार्यांचे विशेष चौकशी पथक SIT तपास करीत आहे. त्यामुळे या प्रकरणाची पडताळणी नव्याने पडताळणी सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून समीर खान आणि अन्य दोन जणांच्या आवाजाचे नमुने एसआयटीला घ्यायचे आहेत. त्यासाठी एनसीबीकडून आज विशेष न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. ही परवानगी मिळाल्यास तिघांच्याही आवाजाचे नमुने घेऊन पुढील तपास केला जाणार आहे.
अमलीपदार्थ प्रकरणात समीर खान आणि बिटिश नागरिक करण सजनानी या दोघांना यावर्षी जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. दोघांकडे मोठ्या प्रमाणात सीबीडी आणि गांजा सापडल्याचा एनसीबीचा दावा होता. त्यातील एकूण 18 नमुने न्यायवैद्यक परीक्षणासाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 11 नमुन्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. एनसीबीच्या तपासात समीर खान आणि करन सजनानी यांच्यातील व्हॉईस चॅटची तपासणी करण्यात आली होती. काही आवाजांचे नमुने गोळा करून त्यांचीही पडताळणी करण्यात आली होती. आता पुढील तपासासाठी आवाजाचे नमुने नव्याने तपासावे लागणार असून, त्यासाठीच एनसीबीने न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रकरणात आधीच्या तपास पथकाने आरोपपत्र दाखल केलेले आहे. समीर खान आणि करन सजनानी या दोघांची जामिनावरही सुटका झालेली आहे.