मुंबई -कोरोना काळापासून सर्वसामान्य जनतेला महागाईची झड पोहचत असून, आता केंद्राने पुन्हा औषध दरवाढीचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वार्षिक होलसेल प्राईस इंडेक्समध्ये 0.5 टक्क्यांनी वाढ करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आता औषधीसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.
महागाईचा भडिमार: एप्रिलपासून औषधांच्या किमतीत होणार वाढ
कोरोना काळापासून सर्वसामान्य जनतेला महागाईची झड पोहचत असून, आता केंद्राने पुन्हा औषध दरवाढीचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वार्षिक होलसेल प्राईस इंडेक्समध्ये 0.5 टक्क्यांनी वाढ करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
प्राईस इंडेक्समध्ये 0.5 टक्क्यांनी वाढ -
नॅशनल फार्मस्यूटीकल प्राइसिंग ऑथिरिटीकडून दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकराने औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वार्षिक होलसेल प्राइस इंडेक्समध्ये 0.5 टक्क्यांची वाढ करण्याची मान्यता दिली आहे. परिणामी एप्रिलपासून पेन किलर टॅबलेट, अँटीइन्फ्लाटीव, कार्डियक आणि अँटीबायोटीक्ससह इतर आवश्यक औषधांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सरकारने 2020 मध्ये डब्ल्यूपीआयमध्ये 0.5 टक्क्यांचा वार्षिक बदल अधिसूचना आली आहे.