महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बकऱ्यांच्या बेकायदा कत्तलखान्यासह वाहतुकीला 'पेटा'चा विरोध

बकरी ईद साजरी करण्या संदर्भात गृह विभागाने काही नियम घालून दिले आहेत. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या नियम भंगाकडे पेटाने(प्राण्यांचे संरक्षण करणारी एक संस्था) लक्ष वेधले आहे. बकऱ्यांचे बेकायदा कत्तलखाने आणि वाहतुकीला पेटाने विरोध केला आहे. तसेच, विक्री करताना कोरोनाबाबतचे निर्बंधही पाळण्यात येत नसल्याचे, पेटाचे म्हणणे आहे.

बकऱ्यांचा फाईल फोटो
बकऱ्यांचा फाईल फोटो

By

Published : Jul 19, 2021, 7:55 PM IST

मुंबई - यावर्षी (२१ जुलै)रोजी बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, काही नियम गृह विभागाने केले आहेत. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या नियम भंगाकडे पेटाने(प्राण्यांचे संरक्षण करणारी एक संस्था) लक्ष वेधले आहे. बकऱ्यांचे बेकायदा कत्तलखाने आणि वाहतुकीला पेटाने विरोध केला आहे. तसेच, विक्री करताना कोरोनाबाबतचे निर्बंधदेखील पाळण्यात येत नसल्याचे, पेटाचे म्हणणे आहे.

'ईद निमित्त विशेष परिपत्रक'

शासनाने निर्बंध जारी केल्यानंतर पेटाने याबाबत सर्व्हेक्षण केले. त्यात शासनाने तयार केलेल्या नियमांना हरताळ फासत बकऱ्यांची विक्री होत असल्याचे, समोर आले आहे. बकरी ईद निमित्त विशेष परिपत्रक तयार करण्यात आलेले आहे. यामध्ये तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर पुढील परिस्थिती पाहता सक्रिय पशु बाजारपेठा बंद ठेवणे व जनावरांच्या खरेदीला केवळ ऑनलाइन किंवा टेलिफोनद्वारे परवानगी देण्यात आली आहे.

'मुख्यमंत्री, मुख्य सचिवांना पत्र'

पेटाच्या सर्व्हेक्षणात मुंबईतील अंधेरी, भायखळा, गोवंडी, जोगेश्वरी, कुर्ला आणि मानखुर्दमधील 23 तात्पुरत्या आणि बेकायदा बकरी बाजारांचा समावेश आहे. आसाम, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमधून सुमारे 1 लाख बकऱ्या कत्तलीसाठी विकल्या गेल्या असल्याचे पेटा इंडियाच्या निदर्शनास आले आहे. बकरे विक्रीत क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल (पीसीए) कायदा, प्राणी वाहतूक नियम, कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन होत आहे, असा पेटाचा आरोप आहे. पेटाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव, मुंबई महानगरपालिका आयुक्त, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना याबाबत पत्रे लिहून तक्रार केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details