महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लसवंतांना लोकल प्रवासात मिळाली मुभा, मात्र फुकट्यांच्या गर्दीने भरतोय लोकलचा डबा - मुंबई कोरोना

लोकल प्रवासाला नुकतीच मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे उपनगरीय लोकलमधून प्रवासी संख्यात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, या प्रवाशांमध्ये अनधिकृत प्रवासी जास्त असल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात गर्दीचा सामना करावा लागतो आहे. अनेक प्रवासी अनधिकृत चाेरवाटा मार्गाने प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई लोकल
मुंबई लोकल

By

Published : Aug 23, 2021, 10:38 PM IST

मुंबई - लसवंतांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासात मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे उपनगरीय लोकलमधून प्रवासी संख्यात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, या प्रवाशांमध्ये अनधिकृत प्रवासी जास्त असल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात गर्दीचा सामना करावा लागतो आहे. अनेक प्रवासी अनधिकृत चाेरवाटा मार्गाने प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रेनच्या डब्यात गर्दी वाढल्याचे चित्र

कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना येत्या १५ ऑगस्टपासून उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार, नागरिकांना लोकल रेल्वे प्रवास करणे सोयीचे व्हावे, त्यांना मासिक रेल्वे प्रवास पास देण्यात आले आहेत. मात्र, एकेरी प्रवासासाठी तिकीट मिळत नसल्याने लसवंताचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. परिणामी बरेच प्रवासी रेल्वे स्थानकात सहज ये-जा करण्यासाठी असलेल्या अनधिकृत चाेरवाटांचा वापरत करत आहेत. परिणामी लोकलच्या गर्दीत वाढ झाली आहे. इतकेच, नव्हे तर आता रेल्वे स्थानकांचे सर्व प्रवेशद्वारे सुरू केल्यानेही अनाधिकृत प्रवाशांची मोठी भर पडली आहे. त्यामुळे पिकवर्समध्ये लोकल ट्रेनच्या डब्यात गर्दी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना गर्दीचा सामना करावा लागत आहे.

७० अनधिकृत चोरवाटा-

मध्य रेल्वेवर सीएसएमटी लाेहमार्ग पाेलिस स्थानका अंंतर्गत पाच, दादर चार, कुर्ला एक, ठाणे अंतर्गत २५, डाेबिंवली चार, कल्याण पाच, कर्जत नऊ, वडाळा तीन, वाशी अकरा तर पनवेल लाेहमार्ग पाेलीस स्थानकांअंतर्गत तीन अशी एकूण ७० अनधिकृत प्रवेशद्वारे (मार्ग) आहेत. पश्चिम रेल्वेवरील वांद्रे लाेहमार्ग पाेलीस ठाण्याअंतर्गत केवळ दाेन अनधिकृत मार्ग आहेत. सायन स्थानकातील कल्याण दिशेच्या धारावी नाईक नगरकडे जाण्यासाठी खुला रस्ता हाेता. त्यामुळे बरेचसे प्रवासी, विदाउट तिकिट प्रवास करणारे त्या दारातून रेल्वे रुळ ओलांडून बाहेर पडायचे. त्यामुळे सायन स्थानकात लाेकलची धडक लागल्याने, मृत्यू हाेणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त हाेती. परिणामी ताे मार्ग लाेखंडी दार लावून बंद केला. मात्र, आजपण बऱ्याच चोरवाटांनी प्रवासी लोकल प्रवास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details