महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात; राज्यातील रुग्णसंख्या घटली, नंदुरबारमध्ये एकही रुग्ण नाही

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असून नंदूरबारमध्ये आज चक्क एकही बाधित रूग्ण आढळून आला नसल्याची बाब राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आली. विदर्भातील वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया उत्तर महाराष्ट्रातील धुळे या सहा जिल्ह्यात १० पेक्षा रूग्ण कमी आढळले. तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा आणि विदर्भातील अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात १०० पेक्षा कमी बाधित आढळून आल्याचे सांगण्यात आले.

नंदुरबारमध्ये एकही रुग्ण नाही
नंदुरबारमध्ये एकही रुग्ण नाही

By

Published : Aug 19, 2021, 8:05 AM IST

मुंबई - राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असून नंदूरबारमध्ये आज चक्क एकही बाधित रूग्ण आढळून आला नसल्याची बाब राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आली. विदर्भातील वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया उत्तर महाराष्ट्रातील धुळे या सहा जिल्ह्यात १० पेक्षा रूग्ण कमी आढळले. तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा आणि विदर्भातील अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात १०० पेक्षा कमी बाधित आढळून आल्याचे सांगण्यात आले.

रुग्णवाढीचा दर २.४४ टक्के कमी

सततच्या कठोर निर्बंधामुळे आणि नागरीकांच्या सजगतेमुळे राज्यात कोरोना रुग्ण संख्या घटली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. जास्त रुग्णसंख्या असलेले जिल्हे सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग हे आहेत. राज्याचा साप्ताहिक सरासरी रुग्णबाधेचा दर २.४४ टक्के इतका आहे. तसेच गत काही दिवसात कोल्हापूर, रत्नागिरी या शहरातील रुग्णवाढीचा दर हा चिंताजनक होता. तथापी, आजघडीला दिलासादायक बाब म्हणजे या जिल्हयांचा साप्ताहिक सरासरी रुग्णवाढीचा दर २.४४ टक्के यापेक्षाही कमी आलेला आहे.

हेही वाचा -राज्यात ऑक्सिजन मर्यादित, सण-उत्सवात नियमांचे उल्लंघन करू नका! मुख्यमंत्र्यांचे आवाहन

१ कोटी ३३ लाख नागरिकांना लस

राज्यात आजघडीला पाच कोटी सात लाखांपेक्षा अधिक कोविड प्रतिबंधक डोस देण्यात आलेले आहेत. राज्यातील ४५ वयोगटावरील जवळपास ५० टक्के नागरीकांना किमान एक डोस देण्यात आलेला आहे. १८ ते ४४ वयोगटातील जवळपास २५ टक्के नागरिकांना किमान एक डोस देण्यात आलेला आहे. राज्यातील एक कोटी तेहतीस लाख सात हजार नागरीकांना कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्याचे राज्य शासनाने यावेळी नमूद केले.

लसीकरणासाठी राज्य शासन प्रयत्नशील

राज्यात १४ ऑगस्ट २०२१ रोजी नऊ लाख चौसष्ट हजार नागरीकांचे कोविड लसीकरण केले आहे. हा देखील महाराष्ट्रातील उच्चांक आहे. राज्य नागरीकांच्या आरोग्याला प्राधान्य देत आर्थिक गतीविधींना चालना देण्याचाही प्रयत्न करीत आहे. यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. नजीकच्या काळात येणारे विविध सण व उत्सव लक्षात घेता गर्दी व्यवस्थापनासाठी नागरीकांचे सहकार्य अपेक्षित आहे. तसेच कोविड प्रतिबंधक उपाययोजना जसे मास्कचा वापर, हाताची स्वच्छता व सुरक्षित शारिरीक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. याचबरोबर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होऊन नागरीकांचा कोविड प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी नागरिकांनी भविष्यात देखील असेच सहकार्य करावे असे आवाहन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आले.

अशी आहे सध्यस्थिती

  • दिवस अखेर आजपर्यंत बाधित झालेले एकूण रुग्ण – ६४ लाख १ हजार २१३
  • बरे झालेले रुग्ण – ६२ लाख १ हजार १६८
  • एकूण मृत्यू – १ लाख ३५ हजार २५५
  • सक्रीय रुग्ण संख्या – ६१ हजार ३०६
  • रुग्ण बरे होण्याचा दर – ९६.८७ टक्के
  • आज रोजी ५ हजार १३२ नवे बाधित
  • ८ हजार १९६ बरे झाले तर १५८ जणांचा मृतकांची नोंद झाली आहे

ABOUT THE AUTHOR

...view details