मुंबई- देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहरातील १ कोटी ३० लाख नागरिकांना सोयी सुविधा पुरवणाऱ्या मुंबई महापालिकेच्या (BMC) नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १८७२ मध्ये मुंबई महापालिकेत ६२ नगरसेवक होते. त्यात गेल्या १४९ वर्षात ५ वेळा वाढ करण्यात आली आहे. आज राज्य सरकारने २२७ नगरसेवकांच्या संख्येत ९ ने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नगरसेवकांची संख्या आता २३६ होणार आहे.
१८७२ ते १९८२ -
मुंबई महापालिकेची स्थापना झाली त्यावेळी म्हणजे १८७२ मध्ये नगरसेवकांची संख्या ६४ होती. १९६३ ला एक सदस्य प्रभाग रचना अंमलात आली यामुळे नगरसेवकांची संख्या ७६ ने वाढून ती संख्या १४० वर गेली. १९८२ मध्ये १९ वर्षांनी वार्ड व नगरसेवक संख्येत मोठा बदल झाला. त्यावेळी अस्तित्वात असलेली वार्ड, नगरसेवक संख्या आणखीन ३० ने वाढविण्यात येऊन ती थेट १७० वर गेली. तसेच, १९८३ च्या सुमारास नगरसेवकांचा निवृत्तीचा कालावधी १ वर्षाने वाढविण्यात आला होता.
१९९१ ते २०२१ -