मुंबई -कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत नव्याने 324 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 5 हजार पार झाला आहे. मुंबईत 13 लोकांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 204 वर पोहोचला आहे. मुंबईतून आतापर्यंत 897 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 5 हजारावर, 31 पत्रकारांची कोरोनावर मात - mumbai corona numbers news
दरम्यान, मुंबईमधील 53 पैकी 31 पत्रकारांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे गेल्या 24 तासात 263 रुग्ण आढळून आले आहेत. तर 22 व 23 एप्रिल दरम्यान खासगी लॅबमध्ये 61 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
![मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 5 हजारावर, 31 पत्रकारांची कोरोनावर मात The number of corona patients in mumbai is over five thousand](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6953698-303-6953698-1587919079687.jpg)
दरम्यान, मुंबईमधील 53 पैकी 31 पत्रकारांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे गेल्या 24 तासात 263 रुग्ण आढळून आले आहेत. तर 22 व 23 एप्रिल दरम्यान खासगी लॅबमध्ये 61 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे मुंबईमधील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 5194 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 204 वर पोहोचला आहे. 13 मृतांपैकी 9 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. 13 मृतांमध्ये 8 पुरुष तर 5 महिला रुग्ण होते. मुंबईमधील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 135 रुग्णांना गेल्या 24 तासात डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत 897 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
31 पत्रकारांची कोरोनावर मात -
मुंबईत मागील आठवड्यात 171 पत्रकारांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 53 पत्रकार पॉझिटिव्ह आले होते. त्यांना गोरेगावच्या हॉटेल आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. गोरेगावच्या हॉटेलमधील क्वारंटाईन असलेल्या 40 पैकी 31 पत्रकारांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या सर्व पत्रकारांना पुढील 14 दिवस होम क्वारेंटाईनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे.