महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा एक हजारावर, 1377 नव्या रुग्णांची नोंद - कोरोना मृत्यूदर मुंबई

शहारात कोरोना आणि ओमायक्रॉन धुमाकूळ ( Corona and omicron patient in mumbai ) घालत आहे. त्यामुळे आता या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्याचबरोबर मंगळवारी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हजाराच्यावर गेल्याने चिंता वाढली आहे. मात्र, तरी देखील पालिका प्रशासनाला कोरोना मृत्यूदर कमी करण्यात यश आले आहे.

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना अपडेट

By

Published : Dec 29, 2021, 4:04 PM IST

मुंबई : शहरात गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूच्या दोन लाटा आल्या होत्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. मात्र, डिसेंबर महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या ( Corona Patients in Mumbai ) वाढू लागली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला 108 रुग्ण आढळून आले होते. परंतु गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. काल (28 डिसेंबरला) रुग्णसंख्या एक हजाराच्यावर गेली आहे आणि 1377 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली (Headache of the municipal health department mumbai ) आहे.

कोरोना रुग्णांत सातत्याने वाढ होत असताना मंगळवारी (28 डिसेंबरला) 1377 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर 1 मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच 338 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 7 लाख 73 हजार 298 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 48 हजार 537 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 374 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 5803 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के ( corona patient recovery rate in Mumbai ) आहे. याबरोबरच रुग्ण दुपटीचा कालावधी 841 दिवसांचा आहे. त्यामुळे मुंबईमधील 37 इमारती आणि एक झोपडपट्टी सील करण्यात आली आहे. 21 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.09 टक्के नोंदवला गेला आहे.

या दिवशी रुग्णसंख्या वाढली -

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा ( Corona in Mumbai ) प्रसार कमी-जास्त प्रमाणात होत आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. जून पासून त्यात घट होऊ लागली होती. त्यानंतर 1 डिसेंबरला कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळून आले होते. 2 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 228 रुग्ण आढळून आले. तसेच 4 डिसेंबरला 228, 8 डिसेंबरला 250, 11 डिसेंबरला 256, 16 डिसेंबरला 279, 17 डिसेंबरला 295, 18 डिसेंबरला 283, 19 डिसेंबरला 336, 21 डिसेंबरला 327, 22 डिसेंबरला 490, 23 डिसेंबरला 602, 24 डिसेंबरला 683, 25 डिसेंबर 757, 26 डिसेंबर 922, 27 डिसेंबरला 809 आणि 28 डिसेंबरला 1377 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.


सात वेळा शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. त्याचप्रमाणे मृत्यूंची संख्या कमी करण्यात देखील यश आले आहे. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात 1 ते 6 मृत्यूंची नोंद झाली होती. 17 ऑक्टोंबर 2021 रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला दुसऱ्यांदा, 15 डिसेंबरला तिसऱ्यांदा शून्य मृत्युची नोंद झाली होती. त्यानंतर 18 डिसेंबरला चौथ्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली होती. 20 डिसेंबरला पाचव्यांदा, 22 डिसेंबरला सहाव्यांदा तर 25 डिसेंबरला सातव्यांदा शून्य मृत्युची नोंद झाली. मृत्युची संख्या शून्य होत (corona patient deaths in Mumbai) असल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details