महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नव्या कोरोना लसीविरोधात रजा अ‌ॅकॅडमीचा फतवा, म्हणाले... - corona vaccine news

कोरोना लसीवरून आणखी वाद पेटण्याची चिन्ह आहेत. बाजारातील नवे व्हॅक्सिन हे इस्लामविरोधी असल्याचा दावा एका मौलानाने केला आहे.

moulana on corona vaccine
"नवी कोरोना लस इस्लामी तत्त्वांच्या विरोधात"

By

Published : Dec 31, 2020, 2:45 PM IST

Updated : Dec 31, 2020, 5:09 PM IST

मुंबई - कोरोना लसीवरून आणखी वाद पेटण्याची चिन्ह आहेत. बाजारातील नवे व्हॅक्सिन हे इस्लामविरोधी असल्याचा दावा एका मौलानाने केला आहे. नवी लस इस्लामी तत्त्व आणि नियमांच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लसीमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांची माहिती मिळेपर्यंत त्याचा वापर न करण्याचे आवाहन मौलाना सईद नुरी यांनी केले आहे. ते रजा अ‌ॅकॅडमीतील मौलाना आहेत.

"नवी कोरोना लस इस्लामी तत्त्वांच्या विरोधात"

काय आहे प्रकरण?

चीनने नव्या पद्धतीने तयार केलेल्या लसीमध्ये डुक्कराच्या मांसाशी संबंधित घटकाचा वापर झाल्याची माहिती मौलाना यांना मिळाली आहे. त्यामुळे या लसीचा वापर न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच संबंधित लसीत कोणते घटक आहेत, हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत लस न वापरण्याचे आवाहन त्यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

"नवी कोरोना लस इस्लामी तत्त्वांच्या विरोधात"

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...)

Last Updated : Dec 31, 2020, 5:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details