मुंबई- मानखुर्द मधील मोहिते पाटील नगरात, सी वॉर्ड बाहेर कचराकुंडी आहे. त्या कचराकुंडीमध्ये हॉस्पिटल मधील जैव वैद्यकीय कचरा नेहमीच टाकण्यात येतो. बुधवारी रात्री ११ वाजता हॉस्पिटलमधील कर्मचारी हा कचरा टाकण्यासाठी आले होते. नगरातील स्थनिक लोकांनी या दोन महिलांना अडवले आणि विचारपूस केली असता, आम्ही शुभम हॉस्पिटलमधील कर्मचारी आहोत. असे त्यांच्या कडून सांगण्यात आले.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
बेकायदेशीररित्या हा कचरा येथे टाकण्यात येतो. शुभम हॉस्पिटल हे खाजगी असून, कोविड सेंटर म्हणून काम करत आहे. हे कोविड सेंटर असून सुद्धा हॉस्पिटलमधील जैव वैद्यकीय कचरा स्थानिक लोकांच्या कचराकुंडी मध्ये बेकायदेशीर रित्या टाकला जात आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाश्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरातील लोक येथे कचरा टाकण्यासाठी येत असतात. यामुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.