मुंबई -राज्य विधीमंडळाचे लांबलेले अधिवेशन येत्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेनेकडून अंबादास दानवे यांच्या नावाचा अर्ज आज दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेचे शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते.
उपसभापतींकडे शिफारस -एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन भाग पडल्याने राज्यात सत्ता पालट झाली. भाजप आणि बंडखोर शिंदे गट सत्तेत आहे. विधान परिषदेतील भाजपकडील विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले. विधानपरिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संख्या प्रत्येकी १० आहे, तर शिवसेनेची संख्या १२ आहे. शिवसेनेने या पदावर दावा केला आहे. विरोधीपक्षात सर्वात जास्त संख्याबळ त्यांच्याकडे विरोधीपक्ष नेतेपद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदावर आमदार अंबादास दानवे यांना हे पद देण्यात यावे, अशी शिफारस उपसभापतींकडे केल्याचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले आहे. दरम्यान, आम्हालाच हे पद मिळेल अशी आशा व्यक्त केली.