महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

घाटकोपरमधून शीतल भानुशालीच्या मृत्यूचे गूढ वाढले - Manhole

3 ऑक्टोबरला घाटकोपर असल्फा येथील एक महिला पाण्यात वाहून गेली होती. तिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी हाजीअली येथे सापडला. ही महिला उघड्या गटारात पडली की, नाल्यात याचा शोध घेतला जात होता. मात्र या चौकशीतून काहीही निष्पन्न झाले नसल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

mumbai crime news
शितल भानूशाली

By

Published : Oct 28, 2020, 7:58 PM IST

मुंबई -घाटकोपर असल्फा येथील एक महिला 3 ऑक्टोबरलापाण्यात वाहून गेली होती. तिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी हाजीअली येथे सापडला. शीतल भानुशाली असे या महिलेचे नाव आहे. ही महिला उघड्या गटारात पडली की नाल्यात याचा शोध घेतला जात होता. यासाठी महापालिकेकडून चौकशी समिती नेमण्यात आली होती. मात्र या चौकशीतून काहीही निष्पन्न झाले नसल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. त्यामुळे शीतल भानुशाली यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे.

महापौर किशोरी पेडणेकर

3 ऑक्टोबरला घाटकोपर येथील उघड्या गटारामध्ये शीतल भानुशाली ही पडली. तिचा मृतदेह 4 ऑक्टोबरला हाजीअलीजवळील समुद्रात सापडला. ही महिला मॅनहोलमध्ये पडल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. ही महिला घाटकोपर असल्फा येथे नाल्यात किंवा मॅनहोलमध्ये पडली असेल, तर तिचा मृतदेह हाजीअलीपर्यंत पोहचला कसा, याची चौकशी करण्याचे आदेश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिले होते. मात्र या चौकशीतून काहीच माहिती मिळू शकली नाही.

महिलेचा मृतदेह हाजीअलीपर्यंत पोहचलाच कसा?

काही वर्षांपूर्वी डॉ. अमरापूरकर मॅनहोलमध्ये पडले होते, व त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पालिकेने अनेक मॅनहोलमध्ये जाळ्या बसवल्या आहेत. तसेच नाल्यांमधील कचरा खाडी आणि समुद्रात जाऊ नये, म्हणून ठिकठिकाणी जाळ्या बसवल्या आहेत. यामुळे या महिलेचा मृतदेह हाजीअलीपर्यंत पोहचलाच कसा याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली होती. याबाबत पोलिसांनीही चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू, असे महापौरांनी म्हटले होते.

याबाबतचा चौकशी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. महिला मॅनहोलमध्ये पडल्याचे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत. तसेच जिथं महिला पडल्याचे सांगितले जात होते, तिथले झाकण निघालेच नव्हते. सीसीटीव्ही उपलब्ध झाले नाहीत किंवा एकही प्रत्यक्षदर्शी मिळाला नाही. त्या गटाराचा प्रवाह हा माहिमकडे जातो, परंतु मृतदेह हा हाजीअलीला कसा गेला. असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळं पुढील तपास पोलीस करतील. मुंबई महापालिका आता अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. आता शीतल भानुशाली यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details