महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईकरांनी या धोकादायक पुलांवरून गणपती मिरवणूकीवेळी खबरदारी घ्या, पालिकेचे आवाहन - dangerous bridges

कोरोनानंतर दोन वर्षाने मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. यासाठी गणेशोत्सव मंडळाकडून मंडप उभारणी, देखावे, सजावटीची कामे सुरु झाली आहेत. यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार असल्याने पालिकेने मुंबईमधील १३ धोकादायक पुलांची यादी जाहीर केली आहे. या पुलावर गर्दी करू नये तसेच बाप्पाच्या विसर्जनावेळी धोकादायक पुलांवरुन योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या पूल विभागाने केले आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

By

Published : Aug 17, 2022, 9:44 PM IST

मुंबई - कोरोनानंतर दोन वर्षाने मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. यासाठी गणेशोत्सव मंडळाकडून मंडप उभारणी, देखावे, सजावटीची कामे सुरु झाली आहेत. यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार असल्याने पालिकेने मुंबईमधील १३ धोकादायक पुलांची यादी जाहीर केली आहे. या पुलावर गर्दी करू नये तसेच बाप्पाच्या विसर्जनावेळी धोकादायक पुलांवरुन योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या पूल विभागाने केले आहे.

धोकादायक पुलांची यादी मुंबईत अनेक जुने धोकादायक पूल असून ते धोकादायक झाले आहेत. अंधेरीत ३ जुलै २०१८ रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि १४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिकेने मुंबईतील धोकादायक पुलांचे सर्वेक्षण केले. यात धोकादायक पुलांची दुरुस्ती व पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहेत. गणेशोत्सवात धोकादायक पुलांवर गर्दी होऊन दुर्घटना होऊ नये यासाठी पालिकेने धोकादायक पुलांची यादी जाहीर केली आहे. पालिका आणि पोलिसांनी दिलेल्या सुचनेनुसारच या पुलांवरून ये-जा करावी असे निर्देशही पालिकेने दिले आहेत.

धोकादायक पुलांची यादी -

- घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रीज
- करीरोड रेल्वे ओव्हर ब्रीज
- आर्थर रोड-चिंचपोकळी रेल्वे ओव्हर ब्रीज ( १६ टन क्षमता)
- भायखळा रेल्वे ओव्हर ब्रीज मांडलिक पूल ( १६ टन क्षमता)
- मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रीज
- सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रीज
- फ्रेंच रेल ओव्हर ब्रीज
- केनडी रेल ओव्हर ब्रीज ( ग्रॅटरोड - चनीॅ रोडच्या मध्ये)
- फॉकलँड रेल्वे ओव्हर ब्रीज ( ग्रॅटरोड व मुंबई सेंट्रल दरम्यान)
- बेलासीस मुंबई सेंट्रल जवळील ब्रीज
- महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हर ब्रीज
- प्रभादेवी-कॅरोल रेल ओव्हर ब्रीज
- दादर - टिळक रेल ओव्हर ब्रीज

हेही वाचा -केंद्रीय नेतृत्वाकडून गडकरींचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न, संसदीय मंडळातून वगळलं

ABOUT THE AUTHOR

...view details