मुंबई-पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि रेल्वे रुळावरची घाण कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून गेल्या काही वर्षांपासून स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. भारतीय रेल्वेने आतापर्यंत 73 हजार 78 रेल्वे डब्यांमध्ये 2 लाख 58 हजार 906 जैव-शौचालये बसवले आले आहेत. त्यामुळे आता रेल्वे मार्ग स्वच्छ झाले आहेत.
रेल्वे परिसर आणि रेल्वे मार्ग स्वच्छ
रेल्वेच्या डब्यात साध्या रचनेतील शौचालय असल्याने, रेल्वे मार्गावर मानवीन मलमूत्र जमा होत असते. त्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच, रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात मानवीय मलमूत्र जमा होत होते. त्यामुळे रेल्वेरूळ दुरुस्ती आणि देखभाल करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जात काम करावे लागत होते. यापूर्वी दिवसाला 30 ट्रक भरेल एवढी घाण रेल्वे मार्गावर टाकली जायची. तसेच, ज्या स्थानकात जास्त कालावधीसाठी रेल्वे थांबत होत्या. त्याठिकाणी ही समस्या वाढत होती. या सर्वांवर उपाय म्हणून मानवी आरोग्य रक्षणाच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने रेल्वेने जैव-शौचालय उभारण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार या जैविक शौचालयामुळे ही घाण एका विशिष्ट टाकीत जमा होत आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेचा आता रेल्वे परिसर आणि रेल्वे मार्ग स्वच्छ दिसून येत आहे.
2 लाख 58 हजार 906 जैव-शौचालये