मुंबई -मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतील माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना नोटीस बजावली आहे. खंडणी प्रकरणी परमबीर सिंह यांना 12 ऑक्टोबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे नोटीसमध्ये उल्लेख आहे. हरियाणाच्या निवासस्थान सोबतच मुंबईतील नीलिमा येथील परमबीर सिंह यांच्या निवासस्थानी नोटीस देण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंह, सचिन वाझे आणि इतरांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- परमबीर सिंह यांचा कसून शोध सुरू -
सेवा नियमांचे उल्लंघन आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाअंतर्गत राज्य सरकारने परमबीर सिंह यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र, अद्यापही या नोटीस संदर्भात त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. तसेच ते नेमके कुठे आहेत? याबाबत राज्य सरकारला कोणतीही माहिती नाही. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त नेमके गेलेत कुठे याचा आता कसून शोध राज्य सरकारकडून घेण्यात येत आहे.
- केंद्रीय गृहमंत्रालयासोबत चर्चा सुरू
परमबीर सिंह देशाबाहेर गेले आहेत, अशा बातम्या बाहेर येत आहेत. या प्रकरणावर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, या प्रकरणावर केंद्रीय गृह मंत्रालयाशी बोलणे सुरू असून, परमबीर सिंह यांचा शोध घेतला जात आहे. सिंह हे सरकारी अधिकारी असल्याने, जर त्यांना कुठेही जायचे असेल तर ते सरकारच्या परवानगीशिवाय जाऊ शकत नाही, असे असूनही, जर ते देशाबाहेर गेले असतील तर ही चांगली गोष्ट नाही. महाराष्ट्र सरकार त्यांना शोधत आहे. त्यानंतर काय करायचे ते ठरवले जाईल. त्यांच्याविरोधात विविध विभागीय कारवाई केली जाईल, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी प्रथम आपल्या कर्तव्यावर परत यावे आणि उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असेही गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले होते.
12 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहणार-