मुंबई -भाजप आमदार गिरीश महाजन ( MLA Girish Mahajan ) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडूनही ( Mumbai High Court ) दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे संबंधित पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात पुढील सुनावणी 15 फेब्रुवारीला होणार आहे. जळगावस्थित शिक्षण संस्थेमध्ये वर्चस्वासाठी वाद सुरू आहे. गिरीश महाजनांच्या सांगण्यावरून धमकावल्याचा याचिकार्त्यांच्या आरोप आहे. या प्रकरणी पुण्यातील कोथरुड पोलीस चौकशी ( Pune Police ) करत आहेत.
Mumbai High Court : पुढील सुनावणीपर्यंत आमदार गिरीश महाजन यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करु नये, उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश - MLA Girish Mahajan
पुढील सुनावणीपर्यंत भाजप आमदार गिरीश महाजन ( MLA Girish Mahajan ) यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करु नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) पोलिसांनी दिले आहेत. गिरीश महाजनांच्या सांगण्यावरून त्यांच्या समर्थकांनी डांबून ठेवत धमकावून खंडणी वसूल केल्याचा आरोप याचिकार्त्यानी केला आहे. या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ते प्रकरण पुण्यातील कोथरुड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी पुणे पोलीस ( Pune Police ) करत आहेत.
नेमके काय आहे प्रकरण..? -जळगावातील बहुचर्चित मराठा विद्या प्रसारक संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईटे गटाला मदत करून आमदार गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. या प्रकरणी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात ( Nimbhora Police Station ) गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा नंतर पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात ( Kothrud Police Station ) वर्ग करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी, 2018 ते जानेवारी, 2021 या दरम्यान घडला होता. पण, त्यांनी तक्रार उशिरा केली आहे. याप्रकरणी गिरीश महाजन, रामेश्वर नाईक, निलेश भोईटे यांच्यासह एकूण 29 जणांविरोधात निंभोरा येथे गुन्हा दाखल करुन तो कोथरूडला वर्ग करण्यात आला आहे.