महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

...अन मुंबई हवामान खात्याचा अंदाज चुकला

नागरिकांचा हवामान खात्यावरील विश्वास उडाल्याच्या लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

मुंबई वेधशाळा

By

Published : Jul 9, 2019, 10:18 PM IST

मुंबई -मागील काही दिवसांपूर्वी शहरात पाणीचं पाणी झाल्याने मुंबईकरांचे खुप हाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 'पाऊस व धसका' असे समीकरण झालेल्या मुंबईकरांसाठी पावसाबाबतची कुठलीही बातमी ऐकली तरी भितीचे सावट होते. त्यातंच 'मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल!' असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र हा अंदाज चुकीचा ठरल्याने नागरिकांचा हवामान खात्यावरील विश्वास उडाल्याचे लोकांच्या प्रतिक्रियेवरून लक्षात येते.

नागरिकांचा हवामान खात्यावरील विश्वास उडाल्याच्या लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

आज दिवसभर मुंबईत पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. सूर्यदर्शनही घडले. मुंबई हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला की; पाऊस कोसळत नाही, असा समज आता दृढ झाला आहे.

30 जूनला मुंबईत जोरदार पाऊस झाला. त्यांनंतरही पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान खात्याने वर्तवलेला अंदाजही फोल ठरला होता.

हवामान खात्याच्या मुसळधार पावसाच्या अंदाजाबाबत वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र, मुसळधार पाऊस झालाच नाही. मात्र कामगारांचे आणि डबेवाल्यांचे नियोजन कोलमडलेले दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details