मुंबई -आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक ( State Cabinet meeting ) होणार असून या बैठकीसाठी पुन्हा एकदा केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis meeting ) यांनाच ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी लागणार आहे. अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे ( Cabinet did not expand ) राज्याचा गाडा हाकण्याची जबाबदारी केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ( Chief Minister and Deputy Chief Minister ) यांच्यावरच अद्याप तरी आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात आणि पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळपास आठ हजार हेक्टर शेत जमिनीला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतील. आज दुपारी बारा वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडेल. अतिवृष्टी असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची सोबत देखील या बैठकीतून मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याची माहिती ( Meeting with district collectors) आहे. यासोबतच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Ajit Pawar demand ) यांनी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा ( Wet drought should be declared ) अशी मागणी केली होती. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांच्या या मागणीबाबत चर्चा होण्याची देखील या बैठकीतून शक्यता नाकारता येत नाही.
ठाकरे सरकारला म्हणू शकतो धक्का -आतापर्यंत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीततून एकनाथ शिंदे सरकारने तात्कालिन ठाकरे सरकारला धक्क्यावर धक्के दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले अनेक निर्णयांना स्थगिती नवीन सरकारकडून देण्यात आली. तर महा विकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्द केले. ते रद्द केलेले घेऊन नव्याने घेण्याचं काम एकनाथ शिंदे सरकार करत आहे. त्यामुळे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारला अजून धक्का दिला जाऊ शकतो अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राज्यात जोरदार पाऊस -सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. लातूरसह औरंगाबाद जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, राज्यात पुढील काही दिवस हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र जोराचा पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ( Maharashtra Monsoon Rains updates ) शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, मुंबई आणि परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. तसेच लातूर, औरंगाबाद, जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला आहे. राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.