मुंबई -दोन वर्षाच्या करोनाच्या सावटानंतर यंदा सण उत्सवावरील निर्बंध शिंदे-फडणवीस सरकारने Shinde Fadnavis Govt उठवले आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी उत्सवाची Ganesh festival धूम आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीसुद्धा वाढल्या आहेत. या भेटीगाठी जरी होत असल्या तरी, यासाठी निमित्त मात्र, गणपतीच्या दर्शनाचे आहे. अशीच भेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण Congress leader Ashok Chavan यांच्यात झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दर्शनाच्या निमित्ताने भेट - राज्यात नाट्यमय सत्तातरानंतर एकनाथ शिंदे, फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. सरकारमध्ये समन्वय व्यवस्थित व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपने, भाजप नेते आशिष कुलकर्णी यांची एकमताने निवड केली. आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेल आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री, भाजप नेते देवेंद्र फडवणीस पोहचले असता त्यादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, अशोक चव्हाण तिथे पोहोचले. दोघांची तब्बल पंधरा मिनिटे चर्चा झाली. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याची सूत्रांकडून माहिती असली तरी, सध्या राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीवर समन्वयक म्हणून आशिष कुलकर्णी कशा पद्धतीने काम करतील अशी मिश्किल चर्चा अशोक चव्हाण, फडणवीस यांच्यात झाली आहे.
कुठलीही राजकीय चर्चा नाही -आशिष कुलकर्णी हे अशोक चव्हाण यांचे मित्र असल्याकारणाने त्यांच्या घरी गणपती दर्शनासाठी पोहोचले होते. त्या दरम्यानच तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहचले. गणपती दर्शनाच्या निमित्ताने दोघांची भेट झाली. परंतु या अगोदर सुद्धा काँग्रेसचे नेते माजी मंत्री अस्लम शेख त्याचबरोबर संग्राम थोपटे यांनी देवेंद्र फडवणीस यांच्या "सागर" या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावरून सुद्धा काँग्रेसमध्ये चर्चांना उधाण आले होते. अशा परिस्थितीत आता अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली चर्चा ही महत्त्वाची ठरणार आहे.