महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन - etv bharat marathi

मुंबईतील पर्यटन स्थळ असलेल्या मरीन ड्राईव्ह येथे मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आज सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे व डॉ.पी.अनबलगन आदी उपस्थित होते.

मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन
मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन

By

Published : Oct 12, 2021, 6:16 PM IST

मुंबई : मुंबईतील पर्यटन स्थळ असलेल्या मरीन ड्राईव्ह येथे मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आज सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे व डॉ.पी.अनबलगन आदी उपस्थित होते.

मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा भवन मुख्य केंद्र प्रस्तावित आहे. इमारतीच्या बांधकामासाठी स्पर्धा घेऊन वास्तूविशारदाची निवड करण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदेअंतर्गत वास्तूविशारदांनी आज सादरीकरण केले. चार नामांकित वास्तुविशारदांनी आपले स्वतंत्र प्रस्ताव मांडले. यामध्ये प्रदर्शन दालन सभागृह, परिषद दालने, ग्रंथालय असे विभाग दर्शविण्यात आले आहेत.

१८ महिन्यांत भवन उभारणार
या प्रकल्पासाठी शासनाने 2500 चौ.मीटर आकाराचा भूखंड मराठी भाषा विभागाकडे हस्तांतरित केला आहे. डिसेंबर 2021 मध्ये बांधकामास सुरुवात करण्यात येईल तर पुढील अठरा महिन्यात मराठी भाषा भवन खुले केले जाईल, अशी माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची निवड करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details