महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Salman Khan Threat Case : सलमान खान धमकी प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग - Crime Branch

प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याला त्याला जीवे मारण्याची धमकी देणारे ( Death threat to actor Salman Khan ) पत्र सलमानचे वडील सलीम खान ( Salim Khan ) यांना सापडले होते. त्यानंतर आता हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आता गुन्हे शाखेचे पथक दिल्लीला जाऊन अटक आरोपींची चौकशी करणार आहे.

Salman Khan Threat Case
सलमान खान धमकी प्रकरण

By

Published : Sep 16, 2022, 8:19 AM IST

मुंबई :पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला ( Famous singer Sidhu Moosewala ) याची गोळ्या झाडून हत्या ( Famous singer Sidhu Moosewa murder case ) करण्यात आली होती. त्यानंतर प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याला त्याला जीवे मारण्याची धमकी देणारे ( Death threat to actor Salman Khan ) पत्र सलमानचे वडील सलीम खान ( Salim Khan ) यांना सापडले. या प्रकरणी जून महिन्यात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आता गुन्हे शाखेचे पथक दिल्लीला जाऊन अटक आरोपींची चौकशी करणार आहे

सलमानला दोन वेळा मारण्याचा प्रयत्न -धमकी मिळाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता सलमान खान, त्याचे वडील लेखक सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. सलमान, सलीम यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने लागलीच कारवाई केली. राज्य सरकारच्या गृह खात्याने सलमान खान, सलीम खान यांची सुरक्षा वाढवली असून त्यासंदर्भात अधिक तपास सुरू केला होता. दरम्यान पंजाब पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर रेकी केल्याचे सलमानला दोन वेळा मारण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक दिल्लीला जाऊन या आरोपींची चौकशी करणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details