मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज ची सुरुवात उद्या करणार आहेत. गुजरातच्या इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटीमध्ये याची सुरुवात केली जाणार आहे. देशातील पहिला इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज (IIBX) हे सोन्याच्या वित्तीय करणाला अधिक चालना देण्यासाठी उपयोगी ठरेल असं तज्ज्ञांचं मत आहे. इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजच्या सुरवातीने भारतात मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच संपूर्ण देशात येणारे सोने आता याच मार्गाने देशात येणार आहे. गुजरात मध्ये तयार करण्यात आलेल्या इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटीमध्ये (IIBX) चे उद्घाटन होणार असून येणाऱ्या दिवसात यामुळे सोन्याचा व्यापार वाढेल असं म्हटलं जातंय. सोने बाजारात भारत देश हा जगातील सर्वात मोठा ग्राहक मानला जातो. याचंच सक्षमीकरण करण्यासाठी बुलियन एक्सचेंज ची सुरुवात अत्यंत महत्त्वाचे मानले जातेय. बुलियन एक्सचेंजच्या सुरुवातीमुळे या क्षेत्रातले ब्रोकर आणि डीलर यांची साखळी तयार केली जाईल.
गुंतवणूकदारांकडे नवीन पर्याय, शेयर मार्केटला बसणार फटका - इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज (IIBX) सुरुवाती मुळे शेअर मार्केट तज्ञ मध्ये मतमतांतरं पाहायला मिळतात. अर्थतज्ञ पंकज जैस्वाल यांच्या मते, इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज भारतामध्ये सुरू होणे हे स्वगतःर्ह्य आहे. पण इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज देशात सुरू झाल्यामुळे त्याचा फटका शेअर मार्केटला नक्कीच पडेल. सामान्य गुंतवणूकदार आणि मोठे व्यापारी यांना गुंतवणूक करण्यासाठी एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच नेहमीच शेअर मार्केट आणि सोने गुंतवणूक एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिली आहे. ज्यावेळेस गुंतवणूकदारांना शेअर मार्केट मध्ये चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता कमी वाटते. त्यावेळेस सोन्याचा बाजार तेजीत असेल अशावेळी गुंतवणूकदार इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज मधे गुंतवणूक करेल. त्यामुळे त्याचा फटका शेअर मार्केटला बसणार आहे.
शेअर मार्केट मधील सामान्य गुंतवणूकदारांना फटका -यासोबतच सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने बाजार तेजीत असल्याने अनेक सामान्य गुंतवणूकदार बुलियन एक्सचेंजमध्ये गुंतवणूक करतील. तसेच बुलियन एक्सचेंज आंतरराष्ट्रीय बाजाराच्या सुसंगत असल्याने गुंतवणूकदार नवीन पर्यायाचा जास्त उपयोग करण्याचा प्रयत्न करेल. याचा शेअर मार्केट मधील सामान्य गुंतवणूकदारांना येणाऱ्या काळात फटका बसेल. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दोन पर्याय गुंतवणूकदारांकडून खुले असल्याने गुंतवणूकदार, व्यापारी यांच्यासाठी ही संधी असल्याचा हिम्मत पंकज जैस्वाल यांनी व्यक्त केला आहे.एक्सचेंजच्या