मुंबई - प्राप्तिकर विभागाने मुंबई गोरेगाव पूर्व दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शगुन टॉवरवर गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा छापा राजू अग्रवाल आणि जेसी कुरुविला यांच्या घरी टाकण्यात आले आहेत.
राजू अग्रवाल २ जी स्पेक्ट्रम प्रकरणात तुरुंगातून सुटल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साखर कारखान्याच्या संचालक पदावर आहेत. या व्यतिरिक्त, जेसी कुरुविल्ला हे राजीव अग्रवाल यांच्यासोबतदेखील काम करतात. जेसी कुरुविला हे संचालक आहेत. शगुन सोसायटीत राहणाऱ्या दोन्ही लोकांच्या घरावर छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाकडून सोसायटीचे सचिव अशोक गोयल यांचीही चौकशी करण्यात आली आहे.
हेही वाचा-माझे नातेवाईक असल्यामुळेच तपास यंत्रणेच्या धाडी - अजित पवार
अजित पवारांनी ही दिली आहे प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की माझ्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाड टाकली याचे मला काही नाही. मात्र, रक्त्याचे नाते म्हणून माझ्या बहिणींच्या घरी धाडी टाकल्या, याचे वाईट वाटते. यापूर्वी अनेक पक्षांची सरकार सत्तेत होती, परंतु, सत्तेचा इतक्या खालच्या थराला वापर कोणी केला नाही, असा संताप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केला. सरकार येतात, जातात. आजपर्यंत सत्तेचा गैरवापर केलेला कोणी पाहिला नाही. जनता सर्वस्व आहे, ती योग्य तो निर्णय घेत असते, असा सूचक इशाराही उपमुख्यमंत्री पवार दिला.