मुंबई:टाटा मोटर्सने निविदा प्रक्रियेत सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केली असताना सुद्धा तांत्रिक कारणास्तव टाटा मोटर्सची टेंडर अपात्र ठरवण्याच्या बेस्टच्या निर्णयाविरोधात 6 मे रोजीच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात कंपनीने आव्हान दिले होते.टाटा मोटर्सने (Electric bus) आपल्या याचिकेत असा युक्तिवाद केला की त्यांनी बेस्टच्या अधिकाऱ्यांसोबतच्या टेंडर प्रक्रिया होण्या आधीच्या बैठकीनंतर प्रक्रिया सुरू केली.जेव्हा बेस्टने टेंडरचे तांत्रिक योग्यतेचे मूल्यांकन प्रकाशित केले तेव्हा त्यांनी टाटा मोटर्सची (Tata Motors) बोलीने तांत्रिकदृष्ट्या गैर म्हणून घोषित केली होते. टाटा मोटर चे टेंडर रद्द करण्याचा निर्णय बेस्ट ने दिला होता.
Mumbai High Court : टाटा मोटर्सच्या बेस्ट विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
टाटा मोटर्सला (Tata Motors)मुंबई उच्च न्यायालयने (Mumbai High Court) झटका दिला आहे. बेस्ट विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. बेस्ट (Best) ने टाटा मोटरची निविदा रद्द केल्या मुळे उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती.
काय आहे प्रकरण- महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) बेस्ट उपक्रमाद्वारे 1400 इलेक्ट्रिकल बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याकरिता निविदा देखील मागण्यात आले होते. यामध्ये टाटा मोटर्सने देखील निविदा भरली होती माझं टाटा मोटर (Tata Motors) चे निविदांना करण्यामागे देण्यात आलेल्या कारण याविरोधात टाटा मोटर्स मुंबई उच्च न्यायालयात बेस्ट विरोधात याचिका दाखल केली आहे. टाटा मोटर्सने देण्यात आलेल्या कारणांमध्ये निविदा योग्य प्रकारात भरण्यात आली नसल्यामुळे निविदांना करण्यात येत असल्याचे व्यसने म्हटले होते.राज्य सरकारच्या पर्यावरणपूरक निधीतून इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा प्रस्ताव बेस्ट होता. बेस्ट प्रशासनाने 1,400 इलेक्ट्रिक बस (Electric bus) एसी बस खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता परंतु त्यावर चर्चा झाली नाही. ईबी ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेडने देशातील टाटा मोटर्सला ठेका न देता ज्याने बसेससाठी सर्वात कमी दराचे टेंडर दिले होते ते ईबी ट्रान्स प्रा. लि.ला दिले होते.
हेही वाचा:राहुल गांधींविरोधात फेक न्यूज चालवल्याचा आरोप.. पत्रकार रोहित रंजनला नोएडा पोलिसांनी केली अटक