महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विधान परिषदेच्या १२ जागांसाठीची महाविकास आघाडी सरकारची यादी राज्यपालांनी केली रद्द

राज्यपालांनी मविआची यादी रद्द केली आहे. आता शिंदे-फडणवीस सरकारने नवी यादी राज्यपालांकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिफारशीला लगेच प्रतिसाद देत ठाकरे सरकारची यादी रद्द करण्याची भूमिका राज्यपालांनी घेतल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विधान परिषदेच्या १२ जागांसाठीची महाविकास आघाडी सरकारची यादी राज्यपालांनी केली रद्द
विधान परिषदेच्या १२ जागांसाठीची महाविकास आघाडी सरकारची यादी राज्यपालांनी केली रद्द

By

Published : Sep 5, 2022, 3:20 PM IST

मुंबई - महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली १२ विधान परिषद सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रद्द करावी अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांकडून राज्यपाल यांना पाठवण्यात आले होते. त्या अनुषंगाने आता राज्यपालांनी ती यादी रद्द केली असल्याने शिंदे- फडणवीस सरकारने नवी यादी राज्यपालांकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिफारशीला लगेच प्रतिसाद देत ठाकरे सरकारची यादी रद्द करण्याची भूमिका राज्यपालांनी घेतल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नवीन १२ सदस्यांचा मार्ग मोकळा - महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या १२ विधान परिषदेच्या सदस्यांची यादी तब्बल दोन वर्ष रखडून ठेवत अखेर आता राज्यपालांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीनंतर ती रद्द केली आहे. या कारणाने आता शिंदे - फडवणी सरकार शिफारस करतील त्या नवीन १२ सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या अनुषंगाने लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने नवीन यादी राज्यपालांकडे पाठवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली होती विनंती - महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला होता. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रत्येकी चार असे सदस्य होते. त्याला राज्यपालांनी ठाकरे सरकार पडेपर्यंत म्हणजेच शेवटपर्यंत मंजुरी दिली नाही परंतु दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली यादी रद्द करावी असे पत्र राजभवनला पाठवले होते. त्याची तत्काळ दखल घेत राज्यपालांनी १२ सदस्यांची यादी रद्द केली आहे.


हेही वाचा - उद्धव ठाकरे यांनी आम्हाला फसवले; लालबाग राजा दर्शनानंतर अमित शाह यांची ठाकरेंवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details