मुंबई -मुंबईचे वैभव असलेली व्हिक्टोरिया बग्गी यात काही बदल करत १४ मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन केले होते. अवघ्या काही दिवसातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे व्हिक्टोरिया बग्गीचे चाक बंद करण्यात आले होते. मात्र, आता तब्बल चार महिन्यानंतर पुढच्या आठवड्यात व्हिक्टोरिया बग्गी मुंबईच्या रस्त्यांवर धावणार असल्याची माहिती उबो राईड्सचे प्रमुख केतन कदम यांनी दिली आहे.
खूशखबर; पुढच्या आठवड्यात धावणार इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गी! - mumbai buggy news
लॉकडाऊनमुळे १४ एप्रिलपासून बंद असलेल्या २४ पैकी ६ इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आलेला होता. त्यामुळे लॉकडाऊनमुळे सायंकाळी चार वाजल्यानंतर मुंबईकरांना बाहेर पडण्यास बंदी होती.
६ इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गी
उबो राईड्सचे प्रमुख केतन कदम यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे १४ एप्रिलपासून बंद असलेल्या २४ पैकी ६ इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आलेला होता. त्यामुळे लॉकडाऊनमुळे सायंकाळी चार वाजल्यानंतर मुंबईकरांना बाहेर पडण्यास बंदी होती. त्यामुळे उद्घाटनानंतर अवघ्या दोन आठवड्यातच व्हिक्टोरिया सेवा बंद करावी लागली होती. आता मात्र रात्री १० वाजेपर्यंत उद्याने, हॉटेल, बाजारपेठा सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडू लागले आहेत. म्हणूनच पुढील आठवड्यात पहिल्या टप्प्यामध्ये सहा व्हिक्टोरिया पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
असे असणार तिकीट दर-
या व्हिक्टोरिया बग्गीची सेवा दक्षिण मुंबईतील हार्निमल सर्कल, कुलाब्यातील ताज हॉटेल समोर आणि नरिमन पॉईंटला ओबेरॉय हॉटेलसमोरून प्रत्येकी दोन व्हिक्टोरिया पर्यटकांना राऊंडसाठी उपलब्ध असणार आहे.दरम्यान, एका व्हिक्टोरियामध्ये सहा पर्यटकांना प्रवास करता येणार आहे. त्यात पर्यटकांना छोटी रपेट आणि मोठी रपेट अशा दोन प्रकारच्या रपेट करता येतील. यामध्ये छोट्या रपेटसाठी एकूण ३०० रुपये आणि मोठ्या रपेटसाठी ५०० रुपये मोजावे लागतील.
असा आहे व्हिक्टोरियाचा इतिहास
ब्रिटिश काळात प्रवासी वाहतुकीसाठी घोडागाडी होती. मात्र, घोडागाडी चालविणाऱ्या बाजूच्या शेजारी बसावे लागे. घोड्याच्या मागच्या बाजूने उंच पॅडलवर पाय देऊन टांग्याच्या पुढच्या जागेत शिरण्यास किंवा बाहेर येण्यास अडचण येत असे, आरामदायक प्रवास होत नव्हता. त्यामुळे आरामदायी प्रवासासाठी इंग्लंडच्या प्रिन्स ऑफ वेर्ल्सने १८६९ साली नवीन रूपातली घोडागाडी फ्रान्समधून इंग्लंडला आयात केली. त्यानंतर १८८२ मध्ये प्रवासी वाहतुकीसाठी पहिली ‘व्हिक्टोरिया बग्गी’ मुंबईत आली. त्याला प्रचंड प्रतीसाद प्रवाशांकडून मिळत होता.
हेही वाचा -MAHA TET : ऑनलाइन अर्ज भरण्यास शिक्षकांना ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ