नाशिक - गणेशाेत्सव मंडळांना एकाच खिडकीतून सर्व परवानगी द्या, परवानगी देताना अडचणी निर्माण करू नका, अन्यथा गणपती बिठाओ आंदोलन करुन गणपती १० दिवस झाकून ठेवण्याचा इशारा नाशिकच्या सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांनी प्रशासनाला दिली आहे. तर, यासंदर्भात गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
गणपती १० दिवस झाकून ठेवण्याचा इशारा -यंदाच्या गणेशोत्सवात डीजे वाजवणारच असे स्पष्ट केले आहे. विसर्जन मिरवणूकीला दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत परवानगी मिळण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त आणि डीजेच्या दणदणाटात होणार आहे. याबाबत नाशिक गणेश मंडळाची बैठक पार पडली. यंदाच्या गणेशोत्सवाचे नियोजन करण्यात येत आहे. गणेशोत्सव साजरा जल्लोषात करण्यासाठी एकाच खिडकीतून सर्व परवानगी द्या, परवानगी देताना अडचणी निर्माण करू नका अन्यथा गणपती बिठाओ आंदोलन करणार असा ईशारा देण्यात आला आहे.