महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पूर परिस्थितीमुळे राज्यात 149 जणांचा मृत्यू, तर 64 जण अद्यापही बेपत्ता

राज्यात आलेल्या पूर परिस्थितीमुळे 149 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर, 64 जण अद्यापही बेपत्ता असून 50 लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या सोबतच संपूर्ण राज्यभरात 3248 जनावरांचा मृत्यू झालेला आहे. पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने घातलेले थैमान यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. खास करून रायगड येथील महाड तालुक्यात असणाऱ्या तळई गावात दरड कोसळून आतापर्यंत 60 गावकऱ्यांचा जीव गेला आहे.

पूर परिस्थितीमुळे राज्यात 149 जणांचा मृत्यू
पूर परिस्थितीमुळे राज्यात 149 जणांचा मृत्यू

By

Published : Jul 25, 2021, 9:49 PM IST

Updated : Jul 26, 2021, 6:58 AM IST

मुंबई - राज्यात आलेल्या पूर परिस्थितीमुळे रविवारपर्यंत 149 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 64 जण अद्यापही बेपत्ता असून 50 लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या सोबतच संपूर्ण राज्यभरात 3248 जनावरांचा मृत्यू झालेला आहे. पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने घातलेले थैमान यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. खास करून रायगड येथील महाड तालुक्यात असणाऱ्या तळई गावात दरड कोसळून आतापर्यंत 60 गावकऱ्यांचा जीव गेला आहे. तर, तिथेच 35 जण अद्यापही बेपत्ता आहेत. यासोबतच चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि मुंबई या परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. तर काही ठिकाणी दरड कोसळून निष्पाप लोकांचे जीव गेले आहेत. राज्य सरकारकडून मिळालेल्या आकड्यांनुसार आतापर्यंत 149 लोकांचा जीव या पूर परिस्थितीमुळे गेला आहे. तर, तिथेच अद्यापही शंभर लोक बेपत्ता आहेत.

पूर परिस्थितीमुळे राज्यात 149 जणांचा मृत्यू

जिल्हा निहाय आकडेवारी

रायगड- 60 मृत्यू, 35 बेपत्ता, 28 जण जखमी, तर 33 जनावरांचा मृत्यू झालेला आहे. रत्नागिरी - 21 जणांचा मृत्यू, 14 जण बेपत्ता, 7 जण जखमी तर 115 जनावरांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर - 7 जणांचा मृत्यू, एक जण बेपत्ता तर, 27 जनावरांचा मृत्यू झाला आहे. सातारा -41 जणांचा मृत्यू, तर 9 जण बेपत्ता आहेत. मात्र, साताऱ्यामध्ये जनावरांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात झाला आहे. इथे 3024 जनावरांचा मृत्यू पूर परिस्थितीमुळे झालेला आहे. सिंधुदुर्ग- 2 जणांचा मृत्यू, 2 जण बेपत्ता तर, 1 व्यक्ती जखमी झाला आहे. मुंबई -4 जणांचा मृत्यू तर, 7 जण जखमी झाला आहे. पुणे - 2 जणांचा मृत्यू. तसेच, 6 जनावरांचा मृत्यू झाला आहे. ठाणे - 12 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी, चार जण बेपत्ता, तर 10 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

राज्यभरात 3248 जनावरांचा मृत्यू

पूरजन्य परिस्थिती आणि दरड कोसळल्यामुळे राज्यामध्ये एकूण आतापर्यंत 149 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर, तिथेच शंभर जण अद्यापही बेपत्ता आहेत. किरकोळ आणि गंभीर अशी जखम होऊन पन्नास लोक जखमी झाले आहेत. तसेच, संपूर्ण राज्यभरात 3248 जनावरांचा मृत्यू झालेला आहे. रायगड रत्नागिरीची गंभीर परिस्थिती पाहता राज्य सरकारकडून दोन्ही जिल्ह्याला तत्काळ प्रत्येकी दोन कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर, तिथेच इतर जिल्ह्यांना प्रत्यकी पन्नास लाखाची मदत देण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्यात एनडीआरएफच्या 25 टीम कार्यरत आहेत. तर, एसडीआरएफच्या चार टीम, कोस्ट गार्डच्या दोन, इंडियन नेव्हीच्या 5 टीम आणि इंडियन आर्मीच्या 3 टीम बचाव कार्यासाठी तत्पर आहेत. चिपळूण येथे पाच तात्पुरत्या निवारण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तर, आत्तापर्यंत राज्यभरातून 229074 एवढ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Last Updated : Jul 26, 2021, 6:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details